Domestic Sugar Market: देशातील साखर बाजार दिवाळीनंतर काहीसा स्थिर झाला आहे. दर मात्र ५००० रुपये क्विंटलवर टिकून आहेत. दिवाळीच्या तुलनेत क्विंटलमागे १० ते २० रुपयांची घट झाली आहे. खरेदीदारांच्या सावध पवित्र्यामुळे साखरेचे दर वेगाने वाढण्याची शक्यता कमी असल्याचे साखर बाजारातील सूत्रांनी व्यक्त केली..बाजारात साखरेला मागणी असली तरी सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामामुळे साखरेची उपलब्धता वाढत आहे. विशेषतः साखरेचे दर तुलनेने उच्च पातळीवर असल्याने खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याऐवजी सावध भूमिका घेतली जात आहे.देशभरातील साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपाचा हंगाम वेग घेत आहे. त्यातून उत्पादित होणारी साखर बाजारात येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बाजारातील पुरवठा वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली. .Maharashtra Sugar Market: साखर दरातील चढ-उताराचा शेतकऱ्यांना लाभ नाही; राजू शेट्टी, महादेव जानकर यांचा सरकारवर आरोप.परिणामी, साखरेला मागणी असूनही व्यापारी आणि मोठे खरेदीदार साठा करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. याचाच परिणाम म्हणून प्रमुख बाजारपेठांमध्ये साखरेचे व्यवहार काहीसे मंदावले आहेत. शनिवारी (ता. २१) महाराष्ट्रातील कारखान्यांचे एक्स-मिल दर एस-३० ग्रेडसाठी ५०८० रुपये, तर एम-३० ग्रेडसाठी ५१४० रुपये प्रति क्विंटल राहिले. कोल्हापूरमध्ये एस-ग्रेड साखरेचे दर प्रति क्विंटल ५०७० ते ५१२० रुपयांच्या दरम्यान नोंदविण्यात आले. दक्षिण कर्नाटकात एस-३० ग्रेड साखरेचे दर ५१५० ते ५२०० रुपये, तर एम-३० ग्रेडचे दर ५२०० ते ५२५० रुपये प्रति क्विंटल होते. या बाजारपेठेत महाराष्ट्राच्या तुलनेत साखरेचे दर काहीसे अधिक असल्याचे दिसून येते..Maharashtra Sugar Market: साखर बाजारात ‘यू-टर्न’.उत्तर प्रदेशात साखरेचे दर उच्च पातळीवरउत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर बाजारपेठेत एम-ग्रेड साखरेचे दर प्रति क्विंटल ५५३० ते ५६२० रुपये होते. उत्तर प्रदेशातील एक्स-मिल एम-३० साखरेचे दरही याच पातळीवर नोंदविण्यात आले. देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये उत्तर प्रदेशातील दर तुलनेने उच्च पातळीवर आहेत. गुजरातमध्ये एस-३० ग्रेड साखरेचे दर ५००१ ते ५२२५ रुपये, तर एम-३० ग्रेडचे दर ५०८१ ते ५४२५ रुपये प्रति क्विंटल राहिले..मध्य प्रदेशात एस-३० साखरेचे दर ५६५० रुपये, तर एम-३० साखरेचे दर ५७०० रुपये प्रति क्विंटल नोंदविण्यात आले. तमिळनाडूमध्ये एस-३० ग्रेड साखरेचे दर ५२०० ते ५९०० रुपये, तर एम-३० ग्रेडचे दर ५३५० रुपये प्रति क्विंटल होते. पंजाबमध्ये एम-३० ग्रेड साखरेचे दर ५७०० ते ६२०० रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहिले..उत्तरेकडून येणारी साखर बाजारात कमीदेशात महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांत साखर उत्पादनाची गती कमी आहे. देशात सध्या तयार होत असलेल्या साखरेपैकी निम्याहून अधिक वाटा केवळ महाराष्ट्राचा आहे. उत्तरेकडील राज्यामध्ये अजूनही म्हणावी तेवढी साखर बाजारात येत नसल्याने या राज्यात साखरेचे दर ५५०० रुपयांच्या आसपास असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.