Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासळीच्या दरात महिनाभरानंतर सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. पापलेटला प्रति किलो १५००, तर सुरमईस प्रति किलोला ११०० रुपयांपर्यंत दर मिळू लागले आहेत. पर्यटन हंगाम सुरू झाल्यामुळे दरात सुधारणा झाली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे..जिल्ह्यात मार्गशीर्ष महिन्यात मासळीच्या दरात घसरण झाली होती. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरदेखील दरात अपेक्षित सुधारणा झाली नव्हती. मात्र गेल्या दहा-बारा दिवसांपासून मासळीच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे..Fish Export Decline: अमेरिकेच्या टेरिफमुळे मत्स्य निर्यातीत घट.सध्या पापलेटला प्रति किलो १५०० रुपये इतका दर मिळत आहे. सुरमई प्रतिकिलो ११०० ते १२०० रुपये, बांगडा प्रति किलो २५० रुपये, सौंदळा ३५० रुपये, तिसरे २०० रुपये, माकुल ३०० रुपये, कोळंबी मोठी ५०० रुपये, लहान ३०० रुपये, मांदेली १०० रुपये, बोंबील २०० रुपये, मोरी सहाशे रुपये, सरंगा ६०० ते ८०० रुपये दर आहे..पर्यटन हंगामाचा परिणामगेल्या काही दिवसांपासून मासळीची आवक काहीशी कमी झाली आहे. त्यातच पर्यटन हंगामाला देखील सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सध्या शनिवार-रविवारी पर्यटकांची चांगली गर्दी असते. त्यामुळे मासळीच्या मागणीत वाढ झाली असून दरात सुधारणा झाली आहे. पर्यटकांचा ओघ कायम राहण्याची शक्यता असल्याने मे अखेरपर्यंत मासळीच्या दरांतील सुधारणा कायम राहील, अशी शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.