Cotton Rate : नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावात सुधारणा

Cotton Market : कापसाचा नवा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर भावात मागील १५ दिवसांमध्ये ३ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

Pune News : कापसाचा नवा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर भावात मागील १५ दिवसांमध्ये ३ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. देशात कापसाचा उपलब्ध असलेला साठा कमी झाला आहे. देशातील कापूस लागवड १० टक्क्यांनी कमी झाली, तर दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्रात पावसामुळे पिकांचे नुकसानही होत आहे. या कारणांमुळे बाजारात सुधारणा दिसत आहे.

आपला कापसाचा नवा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो. सप्टेंबरपासूनच उत्तरेतील राज्यांमध्ये कापसाची आवक सुरू होईल. एरवी नव्या हंगामाच्या आधी म्हणजेच ऑफ सिझनमध्ये कापूस दरात सरासरीच्या तुलनेत जास्त दर दिसतात. नवा माल बाजारात सुरू होण्याच्या तोंडावर दरात नरमाई यायला सुरुवात होते. यंदा मात्र ऐन ऑफ सिझनमध्येच विविध कारणांनी बाजार पडला होता.

Cotton Rate
Cotton Market: कापसाचा भाव स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव गेल्या ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचले होते. देशातही कापसाच्या भावावर दबाव आला. पण आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशातील भाव कोसळले नाहीत. देशातील बाजार ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशातील भाव स्थिर राहण्याचे महत्त्वाचे कारण होते. देशातील उत्पादन कमी राहिल्याने देशात पुरवठा अतिरिक्त झाला नाही. परिणामी देशातील बाजारात भाव टिकून राहिले होते.

गेले तीन महिने कापूस सतत दबावात राहिल्याने नव्या हंगामाविषयी चिंता वाढली होती. कारण ऑफ सिझनमध्ये नेहमी भाव वाढतात, पण यंदा भाव पडले होते. त्यामुळे नवा कापूस बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा पडतात की काय, अशी भीती होती. पण महत्त्वाच्या ३ कारणांमुळे देशात कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे.

Cotton Rate
Cotton Market: कापसाची टंचाई वाढण्याची शक्यता

कापसाचा स्टॉक कमी

सध्या देशात उपलब्ध असलेला कापसाचा स्टॉक. गेल्या हंगामातील कापूस उत्पादनही कमीच राहिले. त्यातच देशातील उद्योगांचा वापर वाढला. निर्यातही २८ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. नव्या हंगामात यंदा २० लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. पावसामुळे नव्या कापसाची आवक उशिरा सुरू झाली तर कापसाची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात कापूस दरात सुधारणा होण्यास मदत झाली.

लागवडीत घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड १० टक्क्यांनी कमी झाली. त्यातही उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, राजस्थानमधील लागवड घटली. गुजरात आणि महाराष्ट्रातही यंदा कापसाचे क्षेत्र घटलेले आहे. गेल्या हंगामात देशात कापसाची लागवड १२२ लाख हेक्टरवर होती. यंदा कापूस लागवड १११ लाख हेक्टरवरच स्थिरावली आहे. लागवड घटल्याने उत्पादनही कमी राहणार, यामुळे भावाला आधार मिळाला.

पावसाचा तडाखा

कापूस उत्पादक गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक भागांत पाऊस झाला. आधीच लागवड कमी आणि त्यात पिकाचे नुकसान होत असल्याने बाजारावर त्याचे पडसाद उमटले. तसेच सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जर चांगला पाऊस झाला तर त्याचा फटका कापूस पिकाला बसू शकतो. ही शक्यताही बाजाराने गृहीत धरली आहे. त्यामुळे दरात आतापासूनच सुधारणा दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com