Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले; सोयाबीन वायदे सुधारल्याचा देशातील बाजाराला फायदा होणार ?

Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा दिसून आली. सोयाबीनने दीड महिन्यानंतर १२ डाॅलरचा टप्पा गाठला होता.
Soybean
SoybeanAgrowon

Pune News : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा दिसून आली. सोयाबीनने दीड महिन्यानंतर १२ डाॅलरचा टप्पा गाठला होता.

तर सोयातेल तीन महिन्याच्या उचांकी पातळीवर पोचले. देशातही आज प्रक्रिया प्लांट्सचे भाव काही प्रमाणात वाढले होते. पण बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र स्थिर होती. 

आंतरराष्ट्रीय बाजारा सोयाबीनचे वायदे आज दीड महिन्यानंतर १२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे व्यवहार बुशेल्समध्ये होतात. जसे आपल्याकडे क्विंटलमध्ये होतात तसे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील हा भाव आपल्या रुपयात ३ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल असा होतो. हे वायद्यांमधील भाव आहे. प्रत्यक्ष खरेदीचे भाव ३ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत. आपल्या सोयाबीनचा भाव आजही ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

Soybean
Soybean Market Rate : ब्राझीलची सोयाबीन उत्पादकता ३२ क्विंटल; ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाच्या अंदाज पुन्हा कपात

सोयापेंडचे भाव सोयाबीनच्या प्रमाणात वाढलेले नाहीत. सोयाबीनच्या भावासाठी सोयापेंडचे भाव खूप महत्वाचे आहेत. सोयापेंड आजही ३३९ डाॅलर प्रतिटनांवर होते. रुपयात हा भाव २८ हजार १०० रुपये प्रतिटन होतो. तर आपल्या सोयापेंडचे भाव ३६ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आहेत.

आपल्या सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव आंतरराष्ट्री बाजारातील भावापेक्षा जास्त असतात त्याचे मुख्य कारण म्हणजे आपले सोयाबीन नाॅन जीएम आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव जीएम सोयाबीन आणि सोयापेंडचे असतात. नाॅन जीएम पिकाला जास्त भाव मिळतो. तसेच अमेरिका, ब्राझील किंवा अर्जेंटीनातून आयात करण्याला खर्चही लागत असतो. यामुळे भारताच्या सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव जास्त असतात. 

Soybean
Summer Soybean Sowing : उन्हाळी सोयाबीनची १०९५ हेक्टरवर पेरणी

खाद्यतेलाचा आधार

सोयातेलाचे भावही तीन महिन्यातील उचांकी पातळीवर पोचले आहेत. सोयाबीनला खाद्यतेलाकडूनही चांगला आधार मिळत आहे. पामतेलाचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. महत्वाच्या पामतेल उत्पादक इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये बायो इंधनासाठी पामतेलाचा वापर वाढला.

तसेच पुरवठ्याबाबतही निश्चिती नाही. सध्या पामतेल आणि सोयातेलाच्या भावात फारसा फरक नाही. त्यामुळे सोयातेलाला मागणी वाढली. ब्राझीलमध्ये बायोडिझेलसाठी सोयातेलाचा वापर वाढला. या कारणांमुळे खाद्यतेलाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. सोयातेलाचेही भाव सुधारत आहेत. याचाही फायदा सोयाबीनला होत आहे. 

देशातील बाजारात काय परिणाम?

भारतात आज अनेक प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव १० ते ३० रुपयांनी वाढवले होते. पण बाजार समित्यांमधील भावपातळी कायम होती. कारण मंदीच्या काळाचा विचार केला तर  वरच्या पातळीवर भावातील वाढ स्थिरावली किंवा कायम राहीली तेव्हाच बाजार समित्यांमधील भावात सुधारणा होते, हा अनुभव आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये आणखी ५ ते ७ टक्के वाढीची अपेक्षा आहे. या भाववाढीचा परिणाम आपल्याही देशात दिसून येईल. पण भावात लेगच फार मोठ्या तेजीची शक्यता नाही. दरात १०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात. तर पुढील दोन महिन्यांमध्ये दरात १०० ते २०० रुपयांची सुधारणा अपेक्षित आहे, असाही अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com