Onion Market Lasalgaon : लासलगाव बाजारसमितीत कांदा लिलाव `मार्च एन्ड`लाही सुरू राहणार

Onion Market Rate : शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान सभेत केली होती.
Onion Market
Onion Market Agrowon

Kanda Bazarbhav : राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारसमितीत ३० व ३१ मार्च रोजी कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

त्यामुळे आता मार्चच्या शेवटी कांद्याचे लिलाव सुरू राहणार आहेत. दरवर्षी मार्चच्या अखेरीस (March End) आर्थिक हिशोबामुळे व्यापारी कांदा लिलाव बंद ठेवत असतात.

मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपल्यामुळे व्यापारी आर्थिक हिशोब पूर्ण करत असतात. त्यामुळे मार्च अखेर चार ते पाच दिवस लिलाव बंद ठेवण्यात येतात.

परंतु यंदा कांद्याचे दर पडल्यामुळे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

त्यामुळे बाजारसमितीच्या व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव ३० व ३१ मार्च रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लाल कांद्याचे दर पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली होती. परंतु शेतकऱ्यांना किमान ६०० रुपये प्रतिक्विंटल अनुदानाची अपेक्षा होती.

दरम्यान किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लॉग मार्च काढण्यात आला.

आंदोलक शेतकऱ्यांचा लॉग मार्च मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्या. त्याचे निवेदन विधानसभेत देण्यात आले.

त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी कांद्याच्या आधीच्या अनुदानात ५० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती.

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान मिळणार आहे. दरम्यान, ३५० रुपयांच्या अनुदानाचे वाटप लवकरच सुरू होणार असल्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

२०० क्विंटल प्रतिशेतकरी या मर्यादेत ३५० रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार असल्याचा शासन आदेश काढण्यात आला आहे. हे अनुदान ३० दिवसांत वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.

अनुदानासाठी अटी

-२०० क्लिंटलपर्यंत प्रतिशेतकरी अनुदान मिळणार.

- परराज्यातून आवक झालेल्या कांद्याला अनुदान मिळणार नाही तसेच व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

- डीबीटीद्वारे आयसीआयीआय बँकेमार्फत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्री पट्टी, पावती, सातबारा उतारा, बँक खाते क्रमांक आदी माहिती असलेला साध्या कागदावरील अर्ज विक्री केंद्रावर करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com