Sugar Market : महाराष्ट्राला सर्वाधिक साखर विक्री कोटा

Sugar Sale Quota : केंद्र सरकारने डिसेंबरच्या स्थानिक विक्रीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे ७ लाख ९९ हजार ४५५ टनांचा साखर विक्री कोटा दिला आहे.
Sugar Market
Sugar MarketAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : केंद्र सरकारने डिसेंबरच्या स्थानिक विक्रीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे ७ लाख ९९ हजार ४५५ टनांचा साखर विक्री कोटा दिला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत हा कोटा ३२ टक्‍क्‍यांनी अधिक आहे. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राला साडेसहा लाख टनांचा कोटा मिळाला होता.

महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेशला ७ लाख ९५ हजार टन इतका कोटा दिला आहे. नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक म्हणजे आठ लाख २२ हजार टनांचा कोटा दिला होता. डिसेंबरमध्ये कर्नाटकला ४ लाख टनांचा कोटा दिला आहे.

ही तीन राज्ये वगळता अन्य राज्यांना एक लाख टनांपेक्षाही कमी साखर विक्रीचे कोटे दिले आहेत. डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने देशातील सर्व कारखान्यांचा मिळून २४ लाख टनांचा विक्री कोटा दिला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत हा कोटा एक लाख टनांनी जादा आहे.

Sugar Market
Sugar Market News : ऑक्टोबरसाठी आणखी एक लाख टनांचा कोटा

दिवाळीच्या पंधरा दिवसांचा कालावधी वगळता सध्या साखरेच्या खरेदी-विक्रीत स्थिरता आली आहे. केंद्राने अजूनही सावधगिरीची भूमिका ठेवली आहे. यंदाच्या हंगामातील नवी साखर देशांतर्गत बाजारात येणार हे गृहीत धरून विक्रीचा कोटाही गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढवला आहे.

कोणत्याही परिस्थितीत येणारी साखर तातडीने विकली जावी व बाजारात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये या उद्देशानेच गेल्या महिन्याच्या तुलनेत यंदा साखर विक्री कोटा एक लाख टनांनी वाढवला आहे.

Sugar Market
Sugar Market : बाजारांत साखरेचे दर स्थिर

यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्र शासनाच्या वतीने भविष्यात साखरेची देशांतर्गत बाजारात टंचाई होऊ नये यासाठी हंगामाच्या प्रारंभापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

आणखी दोन महिन्यांत शीतपेय उद्योगाकडून मागणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर साखरेचे दर पुन्हा जादा वाढून त्याचा परिणाम घरगुती ग्राहकांवर होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

नवे साखर उत्पादन ४३.२० लाख टन

३० नोव्हेंबरअखेर देशात ४३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला. गतवर्षी या तारखेपर्यंत ४५१ कारखाने सुरू झाले होते. ३० नोव्हेंबरपर्यंत ऊस गाळप ५११.०२ लाख टन झाले. ते गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५९.५५ लाख टनांनी कमी आहे. यंदा नवे साखर उत्पादन ४३.२० लाख टनांचे झाले. गत वर्षीपेक्षा ५.१५ लाख टनांनी कमी आहे. सरासरी साखर उतारादेखील o.२ टक्क्यांनी कमी आहे.

यंदा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर हंगाम १ नोव्हेंबरनंतर सुरू झाला. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील उस दर आंदोलनाच्या परिणाम स्वरूप कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होण्यात विलंब झाला आहे.
- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर संघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com