Areca Nut Import : आयातीमुळे गुहागरच्या सुपारीच्या दरात घट

Areca Nut Rate : सुपारीला प्रत्येक मंगलकार्यात पूजेचा मान असतो. गुहागर तालुक्यातील सुपारी वाशी मार्केटमध्ये विक्रीला जाते. तिथून ती गुजरातला मोठ्या प्रमाणात पाठविली जाते.
Areca Nut
Areca Nut Agrowon

Ratnagiri News : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीत सातत्याने सापडलेले सुपारी पीक गुहागर तालुक्यात यावर्षी भरघोस आले आहे; मात्र बाहेरून होणाऱ्या आयातीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तिच्या दरात घट झाली आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्याच्या फळबाग लागवड योजनेत सुपारीचा समावेश करावा, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.

सुपारीला प्रत्येक मंगलकार्यात पूजेचा मान असतो. गुहागर तालुक्यातील सुपारी वाशी मार्केटमध्ये विक्रीला जाते. तिथून ती गुजरातला मोठ्या प्रमाणात पाठविली जाते. सुपारीचे पीक कोकणात जास्त आहे; मात्र, थायलंडसारख्या देशातून व कर्नाटक राज्यातून सुपारी स्थानिक बाजारपेठेत कमी दराने व्यापाऱ्यांना विकली जात आहे.

Areca Nut
Areca Nut : सुपारीच्या विरीपासून बनविलेल्या चपलांना पेटंट

त्यामुळे स्थानिक बागायतदारांच्या सुपारीचा उठाव होत नाही. गेल्या वर्षी ४०० ते ५०० रुपये किलोने जाणारी सुपारी यावर्षी साडेतीनशे दराने विकत घेतली जात आहे. त्यामुळे सुपारी बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. खते, सुपारीची देखभाल, साफसफाई, सुपारी सोलणे मजुरी आदी खर्च यातून सुटत नाही. त्यातच वानर, माकडांचा उपद्रव असल्याने सुपारी फळाचे मोठे नुकसान होते.

Areca Nut
Areca Nut Fruit Fall : फळगळीने सुपारी पीक संकटात

तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर म्हणाले, ‘‘राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. या योजनेत १५ फळांचा समावेश आहे. १०० टक्के अनुदान आहे; मात्र, यामध्ये सुपारीचा समावेश नसल्याने बागायतदारांना या योजनेचा लाभ मिळत नाही. यावर्षी या योजनेसाठी गुहागर तालुक्यातून प्रस्ताव पाठविले आहेत. पुढील कार्यवाही कशी होते यावर सर्व अवलंबून आहे.’’

केवळ पालशेतमध्ये दरवर्षी ८० टन उत्पादन

सुपारी पिकासाठी प्रसिद्ध असणारे गुहागर तालुक्यातील पालशेत, वडद, गिमवी व काळसूरकौंढर, गुहागर ही गावे ओळखली जातात. येथील बागायतदारांचे हमखास उत्पन्नाचे साधन म्हणून सुपारी पिकाकडे पाहिले जाते. गुहागर तालुक्यातील एकट्या पालशेतमध्ये दरवर्षी सुपारीचे पीक ७० ते ८० टन होते. त्या पाठोपाठ वडद व गुहागरचा नंबर लागतो. यावर्षी गुहागर तालुक्यात विशेषकरून पालशेत व वडदमध्ये सुपारीचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com