Grapes Export : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीस प्रारंभ

Market Update : यावर्षी द्राक्षशेतीसमोर अखंड अस्मानी संकट ओढवले. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे. ८ हजार ८३९ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.
Grape
GrapeAgrowon
Published on
Updated on

Sangli News : यावर्षी द्राक्षशेतीसमोर अखंड अस्मानी संकट ओढवले. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे. ८ हजार ८३९ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली असून सौदी अरेबिया आणि दुबई या देशांमध्ये नऊ कंटेनरमधून १७२ टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे.

जिल्ह्यात यंदाच्या सप्टेंबर ते ऑक्टोबरअखेर पाऊस सुरू होता. यामुळे फळ छाटणी लांबणीवर पडली. गोडी छाटणी घेतलेल्या बागांचे नुकसान झाले. बदलत्या वातावरणाचाही द्राक्ष बागेला फटका बसला. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे आले आहेत. जिल्‍ह्यातून यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी अधिक होण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील ८ हजार ८३९ शेतकऱ्यांकडून चार हजार ७९७ हेक्टर क्षेत्राची निर्यात द्राक्षांसाठी नोंदणी झाली आहे.

Grape
Grape Variety : पेटंटेड द्राक्ष वाणांनी आणली नवी संधी

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. जिल्ह्यातून २०२२-२३ या वर्षात युरोपियन देशात ८२५ कंटेनरमधून ९ हजार ७०२ टन तर आखाती देशात ४८९ कंटेनरने ७ हजार ६१५ टन अशी एकूण १७ हजार ९३७ टन द्राक्षे निर्यात झाली होती. त्यातून १८० कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले.

२०२३-२४ या वर्षात ८३४ टनांनी द्राक्ष निर्यात वाढून १८ हजार ७७१ टन द्राक्षाची जिल्ह्यातून निर्यात झाली होती. त्यातून जिल्ह्याला १८७ कोटींचे परकीय चलन मिळाले होते. २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यातून आठ हजार ८३९ हजार शेतकऱ्यांनी चार हजार ७९७ हेक्टर क्षेत्राची द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. दुबई आणि सौदी अरेबियाला निर्यात सुरू झाली असून पहिल्या नऊ कंटेनरमधून १२७ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

Grape
Grape Fraud : फसवणुकीचा फटका, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी

मिरज, जत तालुक्यांची आघाडी

जिल्ह्यातून सर्वाधिक निर्यात द्राक्षाचे क्षेत्र मिरज तालुक्यात एक हजार ४७४ हेक्टर असून त्यानंतर एक हजार ३९७ हेक्टरसह जत तालुक्याचा नंबर लागतो. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत तालुक्याने द्राक्ष निर्यातीत आघाडी घेतली आहे.

निर्यात द्राक्षांसाठी अशी झाली नोंदणी

तालुका....शेतकरी संख्या...क्षेत्र (हेक्टर)

मिरज...२६३५...१४७५

वाळवा....१४७...७१

तासगाव...१४८९...७७१

खानापूर...९४०...४८२

पलूस...२१०...१०५

कडेगाव...२५...१४

आटपाडी...१२३...७३

जत...२१३२...१२९७

कवठेमहाकाळ...११३८...५०८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com