Soybean Rate : कळमना बाजारात हरभरा-सोयाबीन स्थिर

कळमना बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून हरभरा, तूर, सोयाबीनचे दर स्थिर आहेत. सोयाबीनची आवक दरवाढीच्या अपेक्षेने गेल्या आठवड्यात कमी झाली होती.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

नागपूर ः कळमना बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून हरभरा, तूर, सोयाबीनचे दर (Soybean Rate) स्थिर आहेत. सोयाबीनची आवक (Soybean Arrival) दरवाढीच्या अपेक्षेने गेल्या आठवड्यात कमी झाली होती. या आठवड्यात आवक वाढत ती १४५३ क्‍विंटलवर पोचली. गेल्या आठवड्यात ती अवघी ६३० इतकी होती.

Soybean Rate
Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला ४८४९ ते ५४१५ रुपये दर

सोयाबीनच्या दरात घसरण होत असल्याच्या परिणामी शेतकऱ्यांनी विक्रीऐवजी तारणावर भर दिला आहे. त्यामुळेच सुरवातीला १००० क्‍विंटलची आवक ६३० क्‍विंटलपर्यंत खाली आली. आता पुन्हा आवक १४५३ क्‍विंटलवर पोचली आहे. सोयाबीनचे दर गेल्या आठवड्यात ४४०० ते ५३०० असे होते. या आठवड्यात हे दर ४३०० ते ५३८२ रुपयांवर आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजारात मुगाची अनियमित आवक आहे.

Soybean Rate
Soybean Market : सोयाबीनच्या दरात नरमाई

ती १४ ते १६ क्‍विंटल इतकी असून ५४०० ते ५६०० असा दर होता. तुरीची नियमित आवक असली तरी ती ५० ते ४ क्‍विंटलच्या घरात आहे. गुरुवारी (ता.८) सर्वाधीक १०२ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. हा अपवाद वगळता आठवड्यात होणारी आवक १५ ते ७ क्‍विंटल राहिली. तुरीचे व्यवहार गेल्या आठवड्यात ६२०० ते ६४०१ तर या आठवड्यात ६२०० ते ६६०१ असे होते.

Soybean Rate
Chana Pest : ढगाळ वातावरण ठरतेय घाटे अळीसाठी पोषक

बाजारात हरभरा आवक देखील कमी असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात १२५, १६५ याप्रमाणे आवक झाली. हरभऱ्याला गेल्या आठवड्यात ४२०० ते ४५२५ असा दर होता. या आठवड्यात आवक ७४ क्‍विंटल आणि दर ४२५१ ते ४५६० असा मिळाला. तांदूळाची आवक १० क्‍विंटल आणि दर २८०० ते ३१०० रुपये होता. गव्हाची आवक १०० क्‍विंटलची होती. गव्हाला ३१०० ते ३४०० असा दर मिळत आहे.

भाजीपाला-फळ बाजारपेठ...

कळमना बाजार समितीत पेरुची आवक १२५ क्‍विंटल आणि दर १००० ते २००० रुपये होते. सिताफळाला ३००० ते ३५०० असा दर मिळत आवक १० क्‍विंटल झाली. चवळी भाजी आवक ४० क्विंटल आणि दर १००० ते १५०० होता. मुळा आवक १३० क्‍विंटल आणि दर १००० ते १५०० याप्रमाणे मिळाला. मेथी आवक २२० क्‍विंटल तर दर २००० ते २२०० असा होता. पालकाचे व्यवहार १००० ते १२०० रुपयांनी झाले आणि आवक १०० क्‍विंटलची राहिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com