
Amravati News: हरभऱ्याची हमीदराने शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर खुल्या बाजारातही हरभऱ्याच्या किमतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. येथील बाजार समितीत सोमवारी (ता. ७) हरभऱ्याला हमीदरापेक्षा ७० रुपये अधिक दर प्रति क्विंटलला मिळाल्याचे दिसून आले. सरासरी दर ५ हजार ७२० रुपये होता. अकोल्यातील बाजारात काही दिवसांपूर्वी किमान ५२०० रुपयांनी विकला जाणारा हरभरा आता ५७०० ते ५९५० रुपयांनी विकला जात आहे.
रब्बी हंगामातील हरभऱ्याची खुल्या बाजारात आवक सुरू झाली आहे. सोमवारी स्थानिक बाजारपेठेत ३ हजार ७९१ पोत्यांची आवक नोंदविण्यात आली. बाजार उघडल्यानंतर यार्डवर झालेल्या लिलावात शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला किमान ५६५० हा हमीदर व कमाल ५ हजार ८५० रुपये दर मिळाला. शेतकऱ्यांच्या हाती सरासरी ५ हजार ७२० रुपये आलेत. अकोल्यात मंगळवारी (ता. ८) सरासरी ५५५० रुपये दराने हरभरा विकला गेला.
केंद्राने या हंगामात हरभऱ्याला पाच हजार ६५० रुपये हमीदर दिला आहे. या दराने राज्य सरकारने नाफेडमार्फत शासकीय खरेदी चार एप्रिलपासून सुरू केली आहे. जिल्हा मार्केटिंगच्या नऊ व विदर्भ मार्केटिंगच्या १२, अशा एकूण २१ केंद्रांवर ही खरेदी ९० दिवस चालणार आहे. शेतकऱ्यांनी त्यानुसार नोंदणी करण्यास सुरुवात केली असली तरी शासकीय केंद्रांवर नोंदणीसच मुळात विलंब झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीची प्रक्रियाही लांबणार आहे. याचा लाभ खासगी बाजारपेठेतील खरेदीदारांनी घेतला असून चढे दर ठेवून आवक वाढविली आहे.
गेल्या आठवड्यात दरवाढीचा कल तयार झाला. बाजारपेठेत हरभऱ्याची मागणी वाढल्याने हे घडू लागलेले आहे. देश पातळीवर हरभऱ्याला मागणी वाढली आहे. तसेच हमीभावाने सरकारला मालही मिळालेला नाही. याबरोबरच आस्ट्रेलियातून आयात झालेला मालही संपुष्टात आल्याने ही ५०० ते ६०० रुपयांची तेजी दिसून येत असल्याचे अकोल्यातील खरेदीदारांचे म्हणणे आहे. बाजारांत दरामध्ये तेजी दिसून येत असल्याने शासकीय केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.