Gold Custom Clearance Delay Issue: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी केली जाते. मात्र, याच सणापूर्वी देशातील सुवर्ण बाजारावर प्रशासकीय अडथळ्यांचे सावट आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाकडून आवश्यक राजपत्र जारी न झाल्यामुळे देशातील विविध बंदरांवर सोन्याची मोठी खेप ‘कस्टम क्लीअरन्स’अभावी अडकून पडली आहे. यामुळे अक्षय तृतीयेच्या तोंडावर सोन्याचा पुरवठा विस्कळीत होऊन दरवाढीचे संकट ओढवण्याची भीती आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली..कस्टम्स विभागाच्या अधिसूचनेत १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत सोने आयातीची परवानगी असणाऱ्या अधिकृत बँका आणि माध्यमांचा उल्लेख आहे. परंतु, आता त्या संदर्भातील राजपत्राची मुदत संपुष्टात आल्याने धोरण आणि अंमलबजावणीत तफावत निर्माण झाली आहे..Gold Silver Price Today: अर्थसंकल्पाआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; प्रति तोळा ८ हजार ६२० स्वस्त.याचा थेट परिणाम सोन्याचा पुरवठा, उत्पादन आणि निर्यातीवर होत असून हजारो कारागिरांच्या रोजगारावरही टांगती तलवार आहे. याबाबत ‘ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन’ने केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे..अक्षय तृतीयेपूर्वी ज्वेलर्स आगाऊ स्टॉक आणि मॅन्युफॅक्चरिंगची तयारी करतात. अशावेळी कच्चा माल न मिळाल्यास बाजारातील सामान्य पुरवठा साखळी विस्कळीत होईल. ही कोंडी जर लवकर फुटली नाही, तर सोन्याची साठेबाजी वाढण्याची आणि बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे..Gold Price: सोन्याचा दर पुन्हा वधारला; प्रती तोळा १ लाख ५८ हजारांच्या पार.यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते, ज्याचा अंतिम फटका सामान्य ग्राहकांच्या खिशाला बसेल. विदेशी पुरवठादारदेखील रखडलेल्या मालावर दंड आकारत असल्याने आयातदारांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे, असे फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांचे म्हणणे आहे..व्यापारी संघटनेची मागणीसरकारने तातडीने ‘डीजीएफटी’चे (विदेश व्यापार संचालनालय) राजपत्र जारी करावे आणि बंदरांवर रखडलेले सोने प्राधान्याने बाहेर काढण्यासाठी कस्टम्स अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. वेळीच तोडगा न निघाल्यास सणासुदीच्या काळात सुवर्ण बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते ,असे ‘कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे (कॅट) राष्ट्रीय मंत्री शंकर ठक्कर यांंनी म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.