Cotton Rate : ‘कापसाला प्रतिक्विंटल दहा हजारांचा भाव द्या’

शेतकरी बांधवांनी कापसाला भाव मिळेल, या आशेने घराघरांत कापूस साठवून ठेवला आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Jalgaon Cotton Market News : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कापसाला भाव (Cotton Rate) मिळत नसल्याने शासनाने कापसाची दहा हजारांहून अधिक दराने प्रती क्‍विंटल खरेदी करावी, अशी मागणी करीत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी आमदार राजीव देशमुख (Rajeev Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

Cotton Market
Cotton Market: कापूस उत्पादन घटूनही बाजारभाव दबावातच का?

शेतकरी बांधवांनी कापसाला भाव मिळेल, या आशेने घराघरांत कापूस साठवून ठेवला आहे. जास्त दिवस होत असल्याने त्यात पिसवा पडले असून घरातील सर्वांच्या अंगाला खाजरे सुटले आहे.

ज्यामुळे दवाखाने फुल्ल झाले आहेत. कमी भावात कापूस विकून हातात काहीच येत नसल्याने शिल्लक वेचलेल्या कापसाची झाडे घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज निदर्शने करण्यात आली.

Cotton Market
Cotton Market : कापूस, तुरीच्या दरात वाढ; हळदीमध्ये घसरण

शेतकऱ्यांच्या घरात जेव्हा कापूस येतो, तेव्हाच कापसाचे भाव गडगडतात. यावर्षी देखील शेतकऱ्याच्या घरात कापूस येण्यापूर्वी १४ ते १६ हजार रुपये प्रती क्विंटल कापसाला भाव होता.

जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कापूस आला, त्यावेळी मात्र प्रती क्विंटल सात हजार रुपयांपर्यंतचाच भाव आला.

अगोदरच अतिवृष्टी व नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाचे उत्पादन कमी होत आहे. त्यात शेतकऱ्यांना पेरणीचा खर्च व मजूर मिळणेही कठीण झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे रोजचे जगणे व पोट भरणे कठीण झाल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. शकतो. निवेदन देताना माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा परिषदेचे गटनेते शशिकांत साळुंखे, प्रमोद पाटील, अतुल देशमुख आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com