Satara News: आले पिकाच्या दरात गेल्या चार महिन्यांपासून स्थिरता असून, सध्या प्रति गाडीस (५०० किलोस) २३ ते २५ हजार रुपये दर मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून आले बियाणे काढणीस प्रारंभ होणार आहे. दरातील स्थिरतेमुळे या वर्षी सरासरी इतकी लागवड होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. .आले पिकास गत वर्षी एप्रिल ते जून महिन्यात सहा ते सात हजार रुपये प्रति गाडीवर दर गेले होते. मात्र जुलै महिन्यात पिकाच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. जुलै अखेरीस प्रति गाडीला ११ ते १२ हजार रुपये दर मिळाला होता. त्यानंतर दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली..Ginger Benefits: आल्यापासून पावडर, मुरंबा, कॅण्डी.गत वर्षी ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने आले पिकाच्या मागणीत वाढ झाल्याने अवघ्या दहा दिवसांत दरात सरासरी सहा ते सात हजार रुपयांनी सुधारणा झाली होती. जुन्या मालास प्रति गाडीस २४ ते २५ हजार, तर नव्या आल्यास साडेपाच ते सात हजार रुपये दर मिळाले होते..दरातील सुधारणेमुळे नवीन पिकावर शेतकऱ्यांचे लक्ष वाढविण्यात आले होते. गेल्या चार महिन्यांपासून प्रति गाडी १८ ते २४ हजार रुपये दरम्यान दर राहिले आहेत. सध्या प्रतवारीनुसार २३ ते २५ हजार रुपये प्रति गाडी दर सुरू आहेत. काही प्रमाणात नवीन आले काढणीस सुरुवात झाली आहे..Ginger Benefits: आल्यापासून पावडर, मुरंबा, कॅण्डी.मार्च अखेरपर्यंत आले पिकाचे वजन टिकून राहते. त्यानंतर पिकाच्या वजनात काही प्रमाणात घट होते. जून महिन्यात वातावरण बदल्यावर वजन वाढ व फुटवा सुरू होतो. दरातील स्थिरता बघता मार्च महिन्याअखेरीपर्यंत ३० टक्के नवीन आले धुणीला व बियाण्यासाठी काढले जाण्याचा अंदाज आहे..फेब्रुवारीअखेरीस बियाणे खरेदी प्रारंभआले पिकाच्या नवीन लागवडीसाठी फेब्रुवारीअखेरीस बियाणे खरेदी प्रारंभ होणार आहे. बियाणे खरेदीच्या काळात धुणीच्या आले पिकास मिळत असलेल्या दरात तीन ते चार हजार रुपये अधिक दराने खरेदी-विक्री होत असते. गेल्या चार महिन्यांत दरात अधिक सुधारणा झाली नसली तरी दर स्थिर राहिल्याने आले लागवड सरासरी क्षेत्राइतकी होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.