Ginger Rate : आले पिकाला हवा प्रक्रियेचा आधार

जगात चीन आलं उत्पादनात आघाडीवर आहे. चीनमध्ये सर्वाधिक ३९ लाख ६६ हजार टन आलं उत्पादन होतं. तर चीननंतर भारताचा क्रमांक आलं उत्पादनात लागतो.
Ginger Rate
Ginger RateAgrowon

पुणेः देशात आलं उत्पादनात (Ginger Production) महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र देशातील आणि राज्यातील आलं उत्पादक शेतकरी (Ginger Farmer) मागील दोन वर्षांपासून अडचणीत आले आहेत. आल्याचा दर मागील वर्षापासून निम्म्यावर आला. तर दुसरीकडं उत्पादन खर्च (Ginger Production Cost) वाढला आहे. आले उत्पादकांना चांगला दर (Ginger Rate) मिळण्यासाठी आल्यावर प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे.

जगात चीन आलं उत्पादनात आघाडीवर आहे. चीनमध्ये सर्वाधिक ३९ लाख ६६ हजार टन आलं उत्पादन होतं. तर चीननंतर भारताचा क्रमांक आलं उत्पादनात लागतो. भारतात ३८ लाख ५३ हजार टन आलं उत्पादन होतं. देशाचा विचार करता आसाममध्ये आलं पीक जास्त घेतलं जातं. आसाममध्ये सर्वाधिक १६ लाख ७३ हजार टन आलं उत्पादन होतं. तर महाराष्ट्रात १४ लाख सहा हजार टनांच्या दरम्यान उत्पादन हाती येतं.

Ginger Rate
Ginger Production : आले पीक झाले ‘आतबट्ट्या’चे !

म्हणजेच आले उत्पादनात देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. असं असतानाही प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही. आल्याचं पीक किमान नऊ महिने जमिनीखाली असतं. त्यामुळं उत्पादनाचे अंदाज चुकतात. अलिकडच्या काळात कीड-रोग आणि इतर नैसर्गिक संकटांमुळं उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट येतेय. सध्या एकरी केवळ ७५ ते १०० क्विंटलच उत्पादन मिळतंय. उत्पादनात घट होतेय.

Ginger Rate
Ginger Market : आले दरात घसरणच अधिक...

२०१६-१७ मध्ये आल्याला प्रतिक्विंटल ६ ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत होता. मात्र कोरोनानंतर आल्याच्या दरात ग्रहनच लागलं. मागीलवर्षी तर दरात विक्रमी घसरण झाली. मागील हंगामात आल्याला केवळ प्रतिक्विंटल सरासरी ६०० ते ७५० रुपये दर मिळाला. यंदा काही प्रमाणात सुधारणा झाली. मात्र दर आजही ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. यातून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. एका बाजूला खतं व बी-बियाण्याच्या किमती गगणाला भीडल्या. त्यामुळं आलं उत्पादकांचं आर्थिक गणितच डबघाईला आलंय.

आले पिकाला हमीभाव जाहीर केला जात नाही. त्यामुळं व्यापारी मागेल त्या किमतीला द्यावं लागतं. त्यामुळं भांडवली खर्च, पिकांचा कालवधी तसंच सध्याची महागाई यांच्या मेळ घालून हमीभाव ठरवावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. राज्यात आले पिकाचं क्षेत्र मोठं असतानाही नोंदणीकृत व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे. याचा फायदा एजंट घेऊन शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते. या एंजटाचा सर्वत्र सुळसुळाट असून हे दराची गणिते बिघवडतात. यासारख्या एंजटावर बाजार समितीकडून ठोस कारवाई करणं आवश्यक आहे.

आलं उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी केवळ थेट वापरावर अवलंबून चालणार नाही. तर आल्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आल्यापासून आले पावडर, आले तेल, कॅंडी, बिअर, पेस्ट आदी प्रकारच्या पदार्थांचं उत्पादन होऊ शकतं. आले पिकात औषधी गुणधर्म असल्याने औषधांसाठी वापर केला जातो. मात्र असा वापर मर्यादीत आहे. देशात आणि राज्यात प्रक्रिया उद्योगांची उभारणी झाली नाही, त्यामुळं आल्याचा वापरही मर्यादीत राहिला. याचा फटका आले उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com