Sangli News: सांगली येथील बेदाण्याला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळून तब्बल दहा वर्षे उलटली आहेत. मात्र, अपेक्षित लाभ न मिळाल्याने हे मानांकन आजही कागदावरच अडकून राहिले आहे. .द्राक्ष संघाच्या उदासीनतेमुळे निर्यातीच्या संधी, ठोस ब्रँडिंग आणि देश-विदेशातील बाजारपेठ विस्तारासाठी कोणतीही ठोस पावले न उचलल्याने ‘सांगलीचा बेदाणा’ हा जीआय टॅग असूनही तो दुर्लक्षितच राहिला आहे..Raisin Production: बेदाणा निर्मिती शेडवर शांतता.या जीआयचा वापर करून बेदाण्याची देशांतर्गत व निर्यात बाजारपेठ वाढवण्यासाठी द्राक्ष संघ पुढाकार घेणार का, असा सवाल द्राक्ष उत्पादकांकडून उपस्थित होत आहे. २०१४ मध्ये सांगली रेझिन या नावाने येथील बेदाण्याला भौगोलिक मानांकन मिळाले. २०१६ मध्ये हे मानांकन अधिकृतपणे द्राक्ष संघाच्या ताब्यात आले. त्यावेळी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात त्याचा गाजावाजादेखील झाला..मात्र, ‘सांगलीचा बेदाणा’ या ब्रँडने विक्रीसाठी आवश्यक असलेली शेतकरी नोंदणी प्रक्रिया, जनजागृती आणि मार्गदर्शनाबाबत गेल्या दहा वर्षांत एकदाही द्राक्ष संघाने ठोस पावले उचलली नाहीत, ही खंत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. दरम्यानच्या काळात द्राक्ष संघाचे संचालक मंडळ वारंवार बदलले..Raisin Smuggling: बेदाणा तस्करीप्रश्नी शीतगृहांची तपासणी करून कारवाई करा.मात्र, प्रत्येक नवीन मंडळाने जीआयच्या विषयाकडे दुर्लक्षच केले. संघात येणे आणि निघून जाणे एवढाच कारभार सुरू राहिला, अशी टीका बेदाणा उत्पादक करत या अनुषंगाने करत आहेत. तसेच, द्राक्ष निर्यातीसाठी असणाऱ्या ग्रेपनेट प्रणालीप्रमाणे बेदाणा निर्यातीसाठी ग्रेप बोर्ड सुरू करावा, अशी मागणीही द्राक्ष संघाकडून गेल्या दहा वर्षांपासून होत आहे. पण राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली नाही, असे सांगणाऱ्या द्राक्ष संघाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे..मार्केटिंगची जबाबदारी संघाची नाहीजीआय टॅग मिळवण्यासाठी संघाने प्रयत्न केले असले तरी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला नाही, ही बाब द्राक्ष संघाच्या एका संचालकाने मान्य केली. परंतु मार्केटिंगची जबाबदारी संघाची नाही, असा पवित्राही त्यांनी घेतला. अर्थात, याबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.