Sindhudurg News: अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळ निवळल्यानंतर मासळीची आवक किंचित वाढली आहे. त्यामुळे मासळीचे दर देखील स्थिर राहिले असून, पापलेट प्रति किलो १२००, तर सुरमई प्रति किलो १००० रुपये किलो दर आहे..या वर्षी मासळी हंगामाची सुरुवात मच्छीमारांकरिता काहीशी निराशाजनक राहिली. मासळी हंगामाच्या सुरुवातीलाच समुद्रात वादळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मासेमारी थांबवावी लागली..Singi Fish: दुर्मीळ ‘सिंगी‘ माशाच्या प्रजननाचा प्रयोग यशस्वी.त्यानंतर आठ दहा दिवस मासेमारी केल्यानंतर पुन्हा वादळीस्थिती उद्भविली. त्यामुळे पुन्हा मासेमारी ठप्प झाली. या कालावधीत मासळीच्या दरात सुधारणा झाली होती. पापलेटचा दर प्रति किलो १४००, तर सुरमईचा दर प्रति किलो १२०० किलोपर्यंत पोहोचला होता..Fishing Ban : हवामानामुळे मासेमारीवर पुन्हा अवकळा.गेल्या पाच-सहा दिवसांपासून समुद्रातील वातावरण पूर्णतः निवळले आहे. त्यामुळे मासेमारी नौका समुद्रात उतरल्या आहेत. पूर्ण क्षमतेने मासेमारी होत असल्याने मासळीची आवक वाढली आहे. जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, मालवण, आचरा, वेंगुर्ला यांसह आणखी काही ठिकाणी मासळीचे लिलाव होतात. याशिवाय गोवा आणि रत्नागिरीची मासळी देखील सिंधुदुर्गात विक्रीकरिता येते..मासळीची आवक वाढली आणि त्याचबरोबर मागणी देखील वाढल्यामुळे मासळीचे दर सध्या टिकून आहेत. सध्या पापलेट प्रतिकिलो १२०० रुपये, सुरमई प्रति किलो १००० रुपये, मोरी प्रति किलो ४०० रुपये, बांगडा प्रति किलो १८० ते २००, सौंदळा प्रति किलो ३५० ते ४०० कोळंबी मोठी प्रतिकिलो ६०० रुपये, मध्यम ५०० रुपये आणि लहान ३०० रुपये, मांदेली प्रतिकिलो १०० रुपये असे दर आहेत. आणखी काही दिवस मासळीचे टिकून राहण्याचा अंदाज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.