Onion Rate : दराअभावी कांदा उत्पादकांची कोंडी

राज्यभरात प्रमुख कांदा उत्पादक पट्टा असलेल्या नाशिक जिल्ह्यात जानेवारीच्या मध्यानंतर लाल कांद्याची आवक वाढली आहे. तुलनेत मागणी कमी होऊन पुरवठा घटल्याची स्थिती आहे.
Onion Rate | Onion Market Rate
Onion Rate | Onion Market RateAgrowon

Onion Market News नाशिक : राज्यभरात प्रमुख कांदा उत्पादक (Onion Rate) पट्टा असलेल्या नाशिक जिल्ह्यात जानेवारीच्या मध्यानंतर लाल कांद्याची आवक (Onion Arrival) वाढली आहे. तुलनेत मागणी कमी होऊन पुरवठा घटल्याची स्थिती आहे.

परिणामी मोठ्या प्रमाणावर दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. उन्हाळ कांद्यानंतर आता लाल कांद्यातही भाव साधत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

त्यामुळे उन्हाळ कांद्यानंतर खरीप कांद्यानेही दरात धोका केला असाच सूर कांदा उत्पादकांमध्ये आहे.

Onion Rate | Onion Market Rate
Onion Market : कांदा व्यापाऱ्यांचा ‘वॉक आउट’

यंदाचा खरीप व लेट खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अनेक भागात खरीप कांदा लागवडी अडचणीत आल्या. सुरुवातीला सततच्या पावसामुळे रोपवाटिका बाधित होऊन दुबार रोपे तयार करावी लागली.

त्यातच रब्बी उन्हाळ कांद्याच्या तुलनेत खरीप कांद्याचे एकरी उत्पादन कमीच असते. असे असतानाही अनेक भागात बुरशीजन्य रोगांच्या विळख्यात लागवडी सापडल्याने एकरी उत्पादन त्याहूनही कमी झाले आहे.

त्यात वाढलेला उत्पादन खर्च, मजूरटंचाई व कांदा काढणीपश्चात दरात झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे यंदा उत्पन्नाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.

राज्यभरात जानेवारी महिन्याच्या मध्यानंतर लाल कांद्याची आवक वाढू लागली आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, नांदगाव, येवला, उमराणे, मुंगसे (मालेगाव) व सोलापूर बाजार समितीमध्ये मोठी आवक होत आहे.

मात्र मागणी घटल्याने पुरवठा कमी होत असल्याने किमान १०० रुपयांपासून ते कमाल १५०० रुपयांपर्यंत राज्यात दर मिळत आहेत. मात्र प्रतिक्विंटल सरासरी १००० रुपये मिळणारा दर अपेक्षित नसतानाही पदरी पाडून घेण्याची वेळ आली आहे.

Onion Rate | Onion Market Rate
Onion Diseases : ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर कोणता रोग येतो?

लाल कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम एक महिना लांबणीवर गेल्याची स्थिती होती. सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात तुरळक आवक सुरू झाल्यानंतर दर डिसेंबरअखेर ठीक होते.

सुरूवातीला उन्हाळ कांद्याच्या स्पर्धेत लाल कांद्याने बाजी मारली. मात्र आता जानेवारीपासून आवक वाढू लागल्याने दरात मोठी घसरण झाल्याची स्थिती आहे.

राज्यातील प्रमूख बाजार समित्यांतील स्थिती

बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी (शुक्रवारी (ता.३)

मुंबई कांदा बटाटा मार्केट...११८२०...९००...१५००...१२००

जुन्नर आळे फाटा...१२४३७...७००...१४५०...१२००

सोलापूर...५०३५०...१००...१५७०...९००

येवला...२०६७५...१२००...१३०६...९५०

येवला(आंदरसूल)...१४६७०...४००...१२७५...१०००

लासलगाव...३६६६४...५००...१६०१...११८०

लासलगाव (विंचूर)...२१०८५...५००...१५३०...११५०

मालेगाव (मुंगसे)...१८०००...३५०...१२७८...१०५०

सिन्नर (नांदूर शिंगोटे)...१३०५०...२००...१४००...१०५०

चांदवड...१५०००...५००...१४५१...९८०

मनमाड...१४९७६...४००...१२००...१०५०

नांदगाव...२३७८४...१००...१२९०...९५०

वैजापूर...१०३८१...६५०...११३०...१०५०

देवळा...७२५०...३६५...१२४५...१०२५

उमराणे...१७५००...६००...१३६१...१०५०

नामपूर...११८१९...१००...१२१५...९६०

पुणे...१४५५४...४००...१२००...८००

पिंपळगाव बसवंत...२३९५४...३००...१४९५...११००

(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संकेतस्थळ)

देशातून लाल कांद्याची निर्यात सध्या अफगाणिस्तान, आखाती देश व दुबईमार्गे पाकिस्तान येथे होत आहे. सध्या भाव काहीअंशी टिकून आहेत. मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम या देशांत मागणी तुलनेने कमी झाली आहे.

त्यामुळे पुरवठा घटला आहे. देशांतर्गत गुजरातमधील महूवा, भावनगर, गोंडल भागात आवक अधिक आहे. तर राजस्थानमधील अलवर भागात आवक सध्या कमी आहे. त्यामुळे दर अपेक्षित नाहीत.

- मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव (जि.नाशिक)

वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या मानाने पडत्या दरात समाधान मानावे लागले. यंदा १००० ते १२०० रुपये सरासरी दराने कांद्याची विक्री झाली. त्यामुळे पदरी काही पडलेले नाही. फक्त केलेला उत्पादन खर्च भरून निघाला आहे. वातावरणीय बदलांमुळे वाढता पीक संरक्षण खर्च अडचणीचा ठरला.

- मधुकर मोरे, कांदा उत्पादक, मोरेनगर, ता. सटाणा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com