Grape Garming
Grape GarmingAgrowon

Grape Export : सांगली जिल्ह्यातून २ हजार टन द्राक्ष निर्यात

कृषी विभागाने द्राक्ष निर्यात वाढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निर्यातीसाठी गावा-गावात जनजागृती केली जात आहे.

Sangli Grape Export News : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस (Grape Export) गती आली आहे. आजअखेर युरोप आणि आखाती देशांत १५२ कंटनेर म्हणजे २२४३ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने (Agricultural Department) दिली.

कृषी विभागाने द्राक्ष निर्यात वाढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निर्यातीसाठी गावा-गावात जनजागृती केली जात आहे.

त्यामुळे दोन ते तीन वर्षांपासून द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदाच्या हंगामात १६ हजार शेतकरी नोंदणीचा लक्ष्यांक कृषी विभागाने निश्चित केला होता.

त्यापैकी ९ हजार ५१५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात यंदा द्राक्ष निर्यातासाठी ५ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नूतनीकरण केले. ४ हजार ११६ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली असून एकूण ९ हजार ५१५ शेतकरी द्राक्षाची निर्यात करणार आहेत.

यंदा द्राक्षाची निर्यात उशिरा सुरू झाली आहे. प्रारंभी आखाती देशांत द्राक्षाची निर्यात सुरू झाली होती. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून निर्यातीस गती आली.

Grape Garming
Vineyard Management : द्राक्ष मण्यात कमी साखर येण्याची कारणे व उपाययोजना

सध्या युरोपियन देशासह आखाती देशात निर्यात होत आहे. आखाती देशात द्राक्षाची १२३ कंटेनर म्हणजे १ हजार ९६७ टन व युरोपियन युनियन देशात २९ कंटेनर म्हणजे २७६ टन अशी एकूण निर्यात १५२ कंटेनर म्हणजेच २ हजार २४३ टनांपर्यंत झाली.

युरोपियन देशात येत्या आठवड्याभरात निर्यात वाढेल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात द्राक्षाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांनी संख्या वाढली आहे. द्राक्षाच्या निर्यातीस गती आली आहे. यंदा जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात वाढेल, अशी आशा आहे.
प्रकाश नागरगोजे, कृषी अधिकारी (निर्यात) सांगली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com