Agriculture Commodity Market : तूर, मूग, सोयाबीनच्या किमतीत घट

Maize Market : पावसामुळे सर्वच शेतमालाची आवक या सप्ताहात कमी झाली; मात्र मूग व टोमॅटोची आवक वाढत आहे. मक्याची मागणी चांगली आहे.
Tur, Moong, Soybean
Tur, Moong, SoybeanAgrowon
Published on
Updated on

फ्युचर्स किमतीः सप्ताह- १७ ते २३ ऑगस्ट, २०२४

पावसामुळे सर्वच शेतमालाची आवक या सप्ताहात कमी झाली; मात्र मूग व टोमॅटोची आवक वाढत आहे. मक्याची मागणी चांगली आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत गेली काही वर्षे वाढीचा कल होता; तो या वर्षीही कायम राहील असा अंदाज आहे. तूर, सोयाबीन व मूग यांच्या किमती सध्या कमी होत आहेत; पुढील काही दिवस त्या हाच कल दाखवतील. या सप्ताहात कापसाच्या किमती वाढल्या. कांद्याच्या किमतीही ६ टक्क्यांनी वाढल्या.

२३ ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ५६,६८० वर आले होते. या सप्ताहात ते ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ५७,१८० वर आले आहेत. सप्टेंबर फ्युचर्स भाव १.५ टक्क्यांनी वाढून रु. ५७,६९० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स भाव रु. ५८,१०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १.६ टक्क्यांनी अधिक आहेत.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो, २९ मिमि) या सप्ताहात १.८ टक्क्यांनी वाढून रु. १,५४७ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,५७७ वर आले आहेत तर एप्रिल फ्युचर्स रु. १,५९७ आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ४.२ टक्क्यांनी वाढून रु. २,५८५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. २,५५५ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्युचर्स किमती रु. २,५६९ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. २,६०० वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.८ टक्क्यांनी अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १६,०८२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. १५,७५४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स किमती ९.७ टक्क्यांनी घसरून रु. १४,५२० वर आल्या आहेत. डिसेंबर किमती रु. १५,०९८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ४.२ टक्क्यांनी कमी आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ७,८५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी घसरून रु. ७,७०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे; भाव वाढत आहेत.

Tur, Moong, Soybean
Chana Market : हरभरा वायदे सुरू करण्यासाठी दबावगट हवा

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,१२५ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. आवक गेल्या सप्ताहात पुन्हा वाढली.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,४०० वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल कायम आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोयाबीन रु. ४६४६ वर आला होता, त्यानंतर एक महिना किमती वाढत त्यांनी रु. ५,३०१ ची पातळी गाठली. नंतर मात्र त्या सतत उतरत आहेत.

Tur, Moong, Soybean
Soybean Rate : किसान तू रहेगा मौन, तो तेरी सुनेगा कौन

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,२८५ वर आली होती. या सप्ताहात ती १.८ टक्क्यांनी घसरून रु. १०,१०० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ३,३९२ होती; या सप्ताहात ती रु. ३,६१२ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,८३३ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा घसरून रु. १,५०० वर आली आहे. कर्नाटक व आंध्र प्रदेश मध्ये आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com