Sangli Market Rates: पोषक वातावरणाच्या अभावामुळे ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनासह गुणवत्तेलाही बसला आहे. त्यातच बाजारातील आवक वाढल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच दर दबावात आले आहेत. सध्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलो ५० ते ६० रुपये दर मिळत असून, गत वर्षीच्या तुलनेत यंदा दरात तब्बल २० ते ३० रुपयांची घट झाली आहे..यंदा पाण्याची कमतरता, वाढती उष्णता आणि त्यानंतरचे ढगाळ वातावरण याचा ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. प्रतिकूल वातावरणामुळे फुलकळी निघण्यासह फळधारणेलाही अडथळे निर्माण झाले. त्यामुळे फळांची संख्या आणि गुणवत्ताही घटली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध बहर साधत हंगामाला सुरुवात केली आहे..Dragon Fruit Demand: ड्रॅगन फ्रूटची आवक तिपटीने वाढली; दरांवर दबाव.ड्रॅगन फ्रूटचे साधारण चार ते पाच बहार येतात. जुलैपासून काढणी सुरू होते. यंदा हंगाम सुरू होताच पहिल्या बहरातील फळांची काढणी एकाचवेळी सुरू झाल्याने बाजारात आवक वाढली आहे. परिणामी, सुरुवातीपासूनच दरावर दबाव आला असून, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळताना अडचणी येत आहेत..वास्तविक पाहता, ऑगस्टमध्ये ड्रॅगन फ्रूटचा तिसरा बहर सुरू होणे अपेक्षित होते. मात्र बदलत्या वातावरणामुळे दुसऱ्या बहरातील काढणी लांबणीवर पडली आहे. सध्या मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अन्य भागांतून ड्रॅगन फ्रूटची काढणी सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील पहिल्या बहरातील काढणी जवळपास आटोपली आहे..Dragon Fruit Farming: कुटुंबाच्या नात्यातील गोडवा जपत यशस्वी शेती.गेल्या काही दिवसांत ड्रॅगन फ्रूटच्या आवकेत चढ-उतार होत असतानाच मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या दराला आधार मिळाला असून, प्रति किलो दरात १० ते १५ रुपयांनी सुधारणा झाली आहे..हंगामाच्या सुरुवातीलाच दरात मोठी घसरणगत वर्षी हंगामाच्या प्रारंभी ड्रॅगन फ्रूटला प्रति किलो ९० ते १०० रुपये दर मिळाला होता. हंगामाच्या अंतिम टप्प्यातही दर सरासरी ७० रुपयांपर्यंत टिकून राहिला. यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच दरात मोठी घसरण झाली. सध्या गत वर्षीच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटला २० ते ३० रुपये कमी दर मिळत असल्याने उत्पादकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे..यंदा बाजारात इतर राज्यांतूनही ड्रॅगन फ्रूटची आवक होत आहे. त्यामुळे दरात चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. मात्र दर टिकून राहतील, असा अंदाज आहे.– महेश आसबे, ड्रॅगन फ्रूट उत्पादक, वासुद, ता. सांगोला, जि. सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.