विनोद इंगोले Dragon Fruit Prices: स्थानिक फळ व भाजीपाला बाजारात ड्रॅगन फ्रूटची आवक गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने वाढत असून, बुधवारी (ता. २९) ती २१० क्विंटलवर पोहोचली..अवघ्या दोन दिवसांत आवक तिपटीहून अधिक वाढल्याने बाजारातील दरांवर दबाव निर्माण झाला असून, ड्रॅगन फ्रूटला सध्या ४,००० ते ६,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली..Amravati Mango Market: अमरावतीत आंब्याची आवक पोहोचली एक हजार क्विंटलवर.व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २७) अमरावती बाजारात ड्रॅगन फ्रूटची आवक केवळ ६८ क्विंटल होती. त्या वेळी फळाला ७,००० ते ९,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र अवघ्या दोन दिवसांत आवक २१० क्विंटलवर पोहोचल्याने दरात मोठी घसरण झाली. .Dragon Fruit Farming: ड्रॅगन फ्रूट ठरू शकेल राज्यातील ‘फ्यूचर क्रॉप’.सध्या हंगामाची सुरुवात असल्याने पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे..फळांचा दर्जा हा बाजारभाव ठरविणारा महत्त्वाचा घटक आहे. आमच्या बागेतील ड्रॅगन फ्रूट सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले असल्याने गेल्या हंगामात सुमारे दोन टन फळांची विक्री ७,००० रुपये प्रति क्विंटल दराने झाली.- केशव गोतमारे, खुर्सापार, ता. काटोल, जि. नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.