FCI Warehouse : भारतीय अन्न महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर

गोदामाची पाहणी करत असताना प्रश्‍नांची उत्तरे न दिल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.
FCI Warehouse : भारतीय अन्न महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर
Published on
Updated on

मनमाड, जि. नाशिक : येथील अन्न महामंडळासंदर्भात (Food Corporation Of India) (एफसीआय) आलेल्या तक्रारींबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी मंगळवारी (ता. ३) ‘एफसीआय’ला भेट देत पाहणी केली. गोदामाची पाहणी करत असताना प्रश्‍नांची उत्तरे न दिल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ‘एफसीआय’मधील कारभार (FCI Administration) चव्हाट्यावर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

FCI Warehouse : भारतीय अन्न महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर
Food-Nutrition : अन्न-पोषण सुरक्षेचा राजमार्ग

भारतीय खाद्य निगम, अर्थात अन्न महामंडळाचे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे गोदाम असून, येथून राज्यातील इतर भागांत गहू, तांदूळ आदी धान्य सरकारी धान्य दुकानांत पाठवले जाते.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक सरकारी दुकानांत धान्य पोहोचत नसल्याची तक्रार आल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी ‘एफसीआय’मध्ये पाहणी केली. ‘एफसीआय’च्या प्रबंधक मनीषा मीना यांना त्यांनी ‘एफसीआय’मध्ये असलेल्या गहू, तांदळाचा प्रत्येक महिन्यांचा किती साठा उपलब्ध आहे, किती वितरण केले गेले यांसह इतर माहिती विचारली. मात्र मीना यांना ही माहिती देता आली नाही. त्यामुळे पवार यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

FCI Warehouse : भारतीय अन्न महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर
FCI: तेलंगणात तांदूळ प्रक्रियेसाठी मुदतवाढ

या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जय फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, डॉ. सागर कोल्हे, एकनाथ बोडके, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर धिवर, कैलास अहिरे, बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष मयूर बोरसे यांच्यासह अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, एफसीआयचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ‘एफसीआय’मध्ये कार्यरत असलेल्या विविध कामगार संघटनांनी या वेळी कामगारांच्या समस्यांबाबत मंत्री डॉ. पवार यांना निवेदन देत आपले गाऱ्हाणे मांडले.

अस्वच्छता दिसून आल्याने मंत्री डॉ. पवार यांची नाराजी

जानेवारी ते डिसेंबरचा साठा, पुरवठा किती, वाटप कसे केले जाते, याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना अधिकारीदेखील समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. तसेच धान्य मोजले जाणारा वजनकाटा बंद आहे.

एकाच काट्यावर काम सुरू असल्याचे या वेळी दिसून आले. येथून रोज शंभर ट्रक धान्य भरून पाठवले जात आहे. तसेच ‘एफसीआय’मध्ये असलेल्या गोदामाची पाहणी केली असता अस्वच्छता दिसून आल्याने मंत्री डॉ. पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com