Turmeric Cultivation : हळदक्षेत्रात १४ हजार ६८२ हेक्टरने घट

यंदा जिल्ह्यात ३५ हजार ८२ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. गतवर्षीच्या ४९ हजार ७६४ हेक्टरच्या तुलनेत यंदा हळदीच्या क्षेत्रात १४ हजार ६८२ हेक्टरने घट झाली आहे. कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
Turmeric Farming
Turmeric FarmingAgrowon

हिंगोली ः यंदा जिल्ह्यात ३५ हजार ८२ हेक्टरवर हळद लागवड (Turmeric Cultivation) झाली आहे. गतवर्षीच्या ४९ हजार ७६४ हेक्टरच्या तुलनेत यंदा हळदीच्या क्षेत्रात (Turmeric Acreage) १४ हजार ६८२ हेक्टरने घट झाली आहे. कीड, रोगांचा प्रादुर्भाव (Pest Disease Outbreak) वाढला आहे. विविध कारणांनी उत्पादकता (Turmeric Production) कमी झाली आहे. उत्पादन खर्चही वाढला आहे. बाजारभावात सुधारणा नाही. हमीभाव तसेच विमा संरक्षण नाही. त्यामुळे हळदीचे क्षेत्र कमी करून खरिपात सोयाबीन, तर रब्बीत हरभरा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. परिणामी हळदीच्या क्षेत्रात घट होत आहे.

Turmeric Farming
Turmeric : आवळा बागेत हळदीचे आंतरपीक

अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन मिळत आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा ओढा हळदीकडे वाढला. कृषी विभागातर्फे हळद लागवडीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रचार केला जात आहे. गादी वाफा (बेड) लागवड, ठिबक सिंचन पद्धती, विद्राव्य खते, सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे उत्पादकतेत वाढ झाली. हळद लागवड ते काढणी, काढणी पश्चात कामांचे यांत्रिकीकरण झाले.

Turmeric Farming
Turmeric Subsidy : हळद लागवडीसाठी चार हेक्टरपर्यंत अनुदान
हळदीला हमीभाव पीकविमा लागू नाही. कीड, रोगांचे प्रमाण वाढले आहे. उत्पादन खर्च आणि निव्वळ उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्याने यंदा हळद केली नाही.
बालासाहेब राऊत, तेलगाव, ता. वसमत.
निविष्ठांसह मजुरीचे दर वाढले. परंतु उत्पादकता घटल्याने पूर्वीप्रमाणे हळद परवडत नाही.
अतुल राऊत, साखरा, ता. सेनगाव.
अनेक महिन्यांपासून हळदीचे दर प्रतिक्विंटल पाच ते सहा हजार रुपये आहेत. ते किफायतशीर ठरत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन, हरभरा या पिकांकडे वळले आहेत.
प्रल्हाद बोरगड, अध्यक्ष, सूर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, सातेफळ, ता. वसमत.
हळद पिकांतील पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. अतिरिक्त पाण्यामुळे कंदसड होते. कंदमाशीचा प्रादुर्भाव होतो. उत्पादकता तसेच गुणवत्तेवर परिणाम होतो.
डॉ. विश्वनाथ खंदारे, उद्यानविद्याविभाग, ‘वनामकृवि’, परभणी.

जिल्ह्यातील वर्षेनिहाय हळद लागवड क्षेत्र (हेक्टर)

वर्षे...लागवड क्षेत्र

२०१९...३२५३४

२०२०...४१५३८

२०२१...४९७६४

२०२२....३५०८१

तालुकानिहाय तुलनात्मक लागवड स्थिती (हेक्टर)

तालुका...२०२०...२०२१ ...२०२२

हिंगोली...४८४७...६४९२ ...५४०७

कळमनुरी...५९२६...७५७१...६५६८

वसमत ...१६०००...१७६४६...१०६५१

औंढा नागनाथ...९११५...१०७६०...७५८०

सेनगाव...५६५०...७२९५...४८७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com