Market Bulletin: कापूस टिकून आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई दिसून आली. यामुळे कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार झाले होते. देशात मात्र कापसाचा भाव टिकून होता. आाजही देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कापसाला सरासरी ८ हजार २०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक कमीच होती. कच्च्या तेलाचे भाव आणखी कमी झाल्यास कापसावर याचा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन टिकूनआंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंड टिकून होते. पण सोयातेलाच्या भावात नरमाई दिसून आली. कच्चे तेल स्वस्त झाल्याचा परिणाम सोयातेलाच्या भावार दिसून आल्याचे अभ्यासक सांगत आहेत. देशात सोयाबीन मात्र टिकून होते. आजही सोयाबीनला बाजारात सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. तर सोयाबीनला उठाव आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Onion Storage Capacity: कांद्याची साठवणूक क्षमता वाढविण्याची केंद्राकडून तयारी.सरकी तेजीतदेशातील बाजारात मागील काही महीनाभरापासून सरकी भाव तेजीत आहेत. सध्या सरकी तेल आणि सरकी पेंडेला चांगली मागणी आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सरकी तेलाचेही भाव वाढले आहेत. तर तेलबिया पेंडेच्या दरवाढीचा फायदा सरकी दरालाही मिळत आहे. सध्या सरकी बाजारात ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. सध्या बाजारातील कापसाची आवकही कमी होत आहे. त्यामुळे सरकीची आवकही पुढील काळात कमीच राहील, असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Soybean Production: सोयाबीन लागवड, उत्पादन घटणार.डाळिंब तेजीतराज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासत आहे. याचा आधार दराला मिळत आहे. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारले आहेत. सध्या डाळिंब बाजारात ८ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .मका स्थिरावलादेशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून मक्याचा भाव स्थिरावला आहे. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे मक्याचा उठाव काहिसा स्थिरावला आहे. मक्याला सध्या सरासरी प्रतिक्विंटल १६०० ते १९०० रुपये भाव मिळत आहे. मक्याची बाजारातील आवक पुढील काळात कायम राहण्याची शक्यता आहे. तर मक्याचा उठाव मात्र मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.