Market Bulletin:कापूस तेजीतदेशातील बाजारात कापसाचा भाव मागील काही दिवसांपासून तेजीच आहे. कापसाला मागणी वाढल्याने दरातही चांगली सुधारणा दिसून आली. पाॅलिस्टरचे भाव वाढल्याने कापसाला मागणी वाढलेली आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. त्यामुळे कापूस भाव सरासरी ८ हजार ४०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर काही बाजारांमध्ये कापसाला उचांकी १० हजारांचाही भाव मिळाला. बाजारातील आवक कमीच राहण्याचा अंदाज असून मागणी टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचा भावही तेजीतच राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन ६५०० रुपयांवरदेशात सोयाबीनच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील आवक सध्या कमी आहे. तर दुसरीकडे सोयाबीनला उठाव चांगला आहे. सोयाबीनच्या भावाला यामुळे आधार मिळत आहे. सोयातेलाचे भावही वाढलेले आहेत तर सोयापेंडलाही उठाव. यामुळे सध्या बाजारात सोयाबीन सरासरी ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. सोयाबीनला सध्या बाजारात उठाव चांगला आहे. तर सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील तेजी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: कापूस बाजारात तेजी; सोयाबीन दर टिकून, ऊस एफआरपी जाहीर, हिरव्या मिरची दरात चढ-उतार तर हरभऱ्यावर दबाव.मका भाव स्थिरदेशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून मक्याचा भाव दबावातच आहे. बाजारातील मक्याची आवक चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे मक्याचा उठाव मात्र कमी आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. सरासरी मक्याची दरपातळी सध्या १६०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. बाजारातील मक्याची आवक पुढील काही आठवडे चांगली राहण्याची शक्यता आहे. तर मक्याचा भाव स्थिरावलेला असल्याचा दबाव दराव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्याचा भाव या पातळीच्या दरम्यान पुढील काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. . Agrowon Podcast: सोयाबीन टिकून; कापसाला उठाव, हळदीचे भाव टिकून, कांदा दबावातच तर ज्वारी आवक सुधारली .भेंडी आवक टिकून राज्यात मागील काही दिवसांपासून भेंडीची आवक महत्वाच्या बाजारांमध्ये सुधारली आहे. या आवकेमुळे दरही काहीसे नरमले आहेत. सध्या भेंडीला बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी १८०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मोठ्या ग्राहक बाजारांमधील कमाल भाव ३ हजारांच्याही घरात आहे. सध्या भेंडी पिकाला विविध भागात उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे काही दिवसांनंतर आवकेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .लिंबाला उठावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाची आवक कमी झालेली आहे. नुकत्याच झालेल्या वादळी पावसाचा अनेक भागातील लिंबू बागांना फटका बसला आहे. सध्या कमी माल उपलब्ध असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक कमी आणि लिंबाला चांगली मागणी असल्यामुळे दरात वाढ दिसून आली आहे. वाढलेल्या उन्हामुळेही मागणी वाढलेली आहे. सध्या बाजारात लिंबू प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादीतच राहू शकते, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.