Market Bulletin:कापसाची मागणी कायम देशातील बाजारात आज कापसाचा भाव स्थिरावला होता. मागील ३ दिवसांमध्ये कापसाच्या भावात काहिशी सुधारणा दिसून आली. सीसीआयच्या कापूस विक्रीला पसंती मिळत असल्याने सीसीआयही कापसाच्या भावात वाढ करत आहेत. कापसाचा भाव ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाची बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होणार आहे. त्यामुळे कापसाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनला मागणी कायम देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील सुधारणा टिकून आहे. सोयाबीनची बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. तर सोयाबीनचा उठाव कायम आहे. शेतकऱ्यांकडे सध्या सोयाबीनचा स्टाॅक कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तर सरकारने अजूनही खरेदी केलेले सोयाबीन विक्रीसाठी काढलेले नाही. त्यामुळे सोयाबीनला सध्या सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast : सरकीचे भाव तेजीतच; कापूस आवक कमीच, सोयाबीनला उठाव, तूर दबावात तर हळदीचे दर टिकून.आवळ्याला उठावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आवळ्याची आवक कमी झाली आहे. तर आवळ्याला मागणी चांगली आहे. यामुळे आवळ्याचा भाव टिकून आहेत. आवळ्याला बाजारात सध्या प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आवळ्याची बाजारातील आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवळ्याच्या दरातही सुधारणा अपेक्षित असल्याचे व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. .Agrowon Podcast: तुरीचा भाव दबावातच; कापसात काहिशी सुधारणा, सोयाबीनला उठाव, पपईला मागणी तर टोमॅटोवरील दबाव कायम.काकडी स्थिरराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून काकडीची आवक स्थिर आहे. काकडीला वाढत्या उन्हामुळे मागणीही चांगली आहे. त्यामुळे काकडीचे भावही टिकून आहेत. यामुळे काकडीचा भाव प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ४०० ते २ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. काकडी पिकाला वाढत्या उन्हाचा फटकाही बसत आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये काकडीची आवक स्थिरावण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. .बाजरी आवक कायमदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजरीची आवक स्थिरावली आहे. तर वाढत्या उन्हामुळे बाजरीची मागणीही काही प्रमाणात कमी झाली आहे. याचा परिणाम दरावरही दिसून येत आहे. बाजरीला सध्या सरासरी २ हजार ३०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजरीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजरीचे भाव सध्याच्या भावातळीच्या दरम्यान पुढील काही आठवडे राहू शकतात, असा अंदाज बाजरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.