Cotton Market Rate : परभणीतील बाजारपेठांत कापसाचे दर दबावातच

Aajcha Cotton Bajarbhav : जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमधील जाहीर लिलावद्वारे कापूस खरेदीचे दर दबावातच आहेत.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Parbhani News : जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमधील जाहीर लिलावद्वारे कापूस खरेदीचे दर दबावातच आहेत. सोमवारी (ता. २६) मानवत बाजार समितीत कापसाची २०० ते २५० गाडी आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७०५० रुपये तर सरासरी ६९५० रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत कापसाची सुमारे २००० क्विंटल आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७०७५ रुपये तर सरासरी ७१८० रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीत सुमारे ५०० क्विंटल आवक होती. कापसाला किमान ६६५० ते कमाल ६९६० रुपये तर सरासरी ६९०० रुपये दर मिळाले.

Cotton Market
BT Cotton : बीटी वाणांची निवड करताना घ्यावयाची काळजी

मानवत बाजार समितीत शुक्रवारी (ता. २३) कापसाची ४७५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७०७० रुपये तर सरासरी ६९७५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २२) कापसाची ४००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ६००० ते कमाल ७१६० रुपये तर सरासरी ७०५० रुपये दर मिळाले. बुधवारी(ता. २०) कापसाची ४७५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७१९० रुपये तर सरासरी ७१०० रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Lagwad : सघन पद्धतीने कपाशी लागवड

मागील आठवड्याच्या तुलनेत मानवत बाजार समितीत कापूस दरात किमान दरात २०० रुपयांनी सुधारणा झाली. मात्र कमाल थोडी दरात घसरण झाली. आवकदेखील काही प्रमाणात कमी राहिली. सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. २४) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७१२५ रुपये तर सरासरी ७०४० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २१) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६२८० ते कमाल ७२६० रुपये तर सरासरी ७१८० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २१) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७३०० रुपये तर सरासरी ७२५५ रुपये दर मिळाले.

शेतकऱ्यांचे नुकसान

बाजार समित्यातील लिलावातील दर आणि खेडा पद्धतीच्या कापूस खरेदीच्या दरात १००० ते २००० रुपयांचा फरक आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परंतु वाहतूक भाडे विचारात घेऊन अनेक शेतकरी गावात आलेल्या व्यापाऱ्याला कापूस विक्री करत आहेत. यंदा अपेक्षित दर न मिळाल्यामुळे कमी दराने कापूस विक्री करावी लागलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com