Jalgaon Cotton Market Update : खानदेशात कापूस दर नीचांकी स्थितीत म्हणजेच प्रतिक्विंटल ७३०० ते ७४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आवक प्रतिदिन ८० हजार क्विंटलपर्यंत पोचली आहे. आवक वाढल्याने दर पातळी घसरली आहे.
या महिन्यात आवक अधिक वाढली आहे. एप्रिलमध्ये प्रतिदिन सरासरी ६८ हजार क्विंटल एवढ्या कापसाची आवक खानदेशात झाली. या महिन्यात मागील तीन ते चार दिवसांत आवक वाढली आहे. कारण पावसाळी वातावरण निवळले आहे. मजूरही कामावर परतले आहेत. कापूस प्रक्रिया कारखान्यांत वेगात काम सुरू आहे.
कापसाची गरज वाढली आहे. यामुळे खेडा खरेदी वाढली आहे. आवकही अधिक होत आहे. परिणामी, दरावर दबाव आणखी वाढला आहे. खानदेशात सध्या रोज १३ ते १४ हजार (एक गाठ १७० किलो रुई) गाठींची निर्मिती कारखान्यांत होत आहे. ही प्रक्रिया आणखी वेग घेईल. कारण कापसाची आवक व्यवस्थित होत आहे.
मागील महिन्यात खेडा खरेदीत सरासरी दर ७५०० ते ७६०० रुपये मिळत होता. पण या महिन्यात दरात घसरण झाली आहे. किमान दर ७३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. नीचांकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे.
यंदा खानदेशात नोव्हेंबरच्या सुरुवातीला खेडा खरेदीचे कमाल दर ९२०० ते ९३०० रुपये प्रतिक्विंटल होते. फेब्रुवारीपर्यंत दर कमी होत गेले. पण या काळात किमान दर ८१०० ते ८२५० रुपये प्रतिक्विंटल होते.
क्विंटलमागे शेतकऱ्याचे १९०० रुपये नुकसान
मार्च व एप्रिलमध्ये दर ७८०० रुपयांखालीच राहिले आणि या महिन्यातील दर ७४०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. एक क्विंटलमागे शेतकऱ्याला सध्या १८०० ते १९०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
घरात अधिक दिवस कापूस साठवून ठेवल्यास त्याचे नुकसान होते. शिवाय जेथे कापूस आहे, तेथे आता चारा साठवायचा आहे. यामुळे कापसाची विक्री अनेक शेतकरी करीत आहेत.
३२ ते ३५ टक्के शेतकऱ्यांकडे कापूससाठा
खानदेशात आजघडीला सुमारे ३२ ते ३५ टक्के शेतकऱ्यांकडे कापूस साठा आहे. हा साठा जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जळगाव या भागात अधिक आहे. धुळे व नंदुरबारात फक्त २० ते २५ टक्के शेतकऱ्यांकडेच कापूससाठा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.