Agriculture Commodity Market : कापूस, मका, टोमॅटोच्या भावात वाढ

Maize Market : १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या दरम्यान, गेल्या वर्षीच्या (१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४) तुलनेने देशातील मक्याची आवक ५६ टक्क्यांनी वाढली. तर कापूस (८ टक्के), मका (८९ टक्के), हळद (६३ टक्के), कांदा (४८ टक्के) व टोमॅटो (४० टक्के) अशी आवकेमध्ये वाढ दिसून आली.
Agriculture Commodity Market
Agriculture Commodity MarketAgrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती ः सप्ताह २६ एप्रिल ते २ मे, २०२५

१ मेपासून NCDEX मध्ये मक्याचे सप्टेंबर डिलिव्हरीचे व्यवहार सुरू झाले. MCX मध्ये आधीच्या वेळापत्रकानुसार कापसाचे नोव्हेंबर व जानेवारी डिलिव्हरीचे व्यवहार सुरू होणार होते; ते आता लांबणीवर टाकण्यात आले आहेत. तेथे आता कापसाचे फक्त या वर्षासाठीचे (मे, जुलै व सप्टेंबर) व्यवहार चालू आहेत.

NCDEX मध्ये मात्र कपाशीचे नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरीसाठी व्यवहार चालू आहेत. त्यावरून पुढील वर्षासाठी किमतीचे अंदाज करू शकता येतील व या महिन्यात हमीभाव जाहीर झाले तर हेजिंग व फॉरवर्ड डिलिव्हरी करार करण्याचा विचार करता येईल. NCDEX मध्ये मक्याचे मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर डिलिव्हरी व्यवहार चालू आहेत तर हळदीचे मे, जून, ऑगस्ट व ऑक्टोबर डिलिव्हरी व्यवहार करता येतील.

१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या दरम्यान, गेल्या वर्षीच्या (१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४) तुलनेने देशातील मक्याची आवक ५६ टक्क्यांनी वाढली. तर कापूस (८ टक्के), मका (८९ टक्के), हळद (६३ टक्के), कांदा (४८ टक्के) व टोमॅटो (४० टक्के) अशी आवकेमध्ये वाढ दिसून आली.

या सप्ताहात कापूस, मका व टोमॅटो यांचे भाव वाढले; इतर पिकांचे भाव घसरले. कांद्याचे भाव रु. १,१९० वर आले आहेत, तर टोमॅटो रु. १,१०० पर्यंत गेला आहे.

२ मे २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी ः

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात पुन्हा ०.२ टक्का वाढून रु. ५४,७०० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव रु. ५६,००० वर आले आहेत. सप्टेंबर भाव रु. ५७,५०० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात १.५ टक्क्याने वाढले.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात ०.९ टक्क्याने वाढून रु. १,४८१ वर आले होते. या सप्ताहात ते रु. १,४८२ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५३८ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स रु. १,५६३ वर आले आहेत. कापसाचे या वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. (अनुक्रमे रु. १,४२४ व रु. १,५०४ प्रति २० किलो.)

मका ः

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) या सप्ताहात त्या ७.२ टक्क्यांनी घसरून रु. २,२०० वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती १.९ टक्क्याने वाढून रु. २,२५५ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स रु. २,२६६ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) कमी आहेत.

हळद ः

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात १ टक्क्याने वाढून १४,८८९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.८ टक्क्याने घसरून रु. १४,६१६ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. १४,५३४ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १४,७६८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १ टक्क्याने अधिक आहेत. सांगलीमधील (राजापुरी) स्पॉट भाव १.६ टक्क्याने वाढून रु. १६,१०० आहे.

Agriculture Commodity Market
Maize Production : खानदेशात मका पिकात उत्पादन कमी

हरभरा ः

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १.३ टक्क्याने वाढून रु. ६,००० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,८५० वर आल्या आहेत. नवीन हंगामासाठी हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे. आवक वाढती आहे.

मूग ः

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,७०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे; मुगाचा हंगाम आता संपला आहे.

Agriculture Commodity Market
Soybean Procurement Scam : सोयाबीन खरेदीत अनियमितता करणारी केंद्रे काळ्या यादीत टाका

सोयाबीन ः

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.७ टक्क्यांनी घसरून रु. ४,४६९ वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्क्याने घसरून रु. ४,४४४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात ०.१ टक्क्याने घसरले.

तूर ः

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ७,०६७ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ७,०३३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा ः

कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात ४.२ टक्क्यांनी घसरून रु. १,१९० वर आली आहे. कांद्याची आवक टिकून आहे.

टोमॅटो ः

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,००० वर आली होती; या सप्ताहात ती रु. १,१०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com