Farmers Benefit: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात कोथिंबीर, मेथीची आवक घटली आहे. यामुळे दरात सुधारणा झाली. बाजारात बुधवारी (ता. २२) रात्री झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला प्रतवारीनुसार शेकडा एक हजार ते चार हजार दोनशे रुपये तर मेथीच्या जुडीला प्रतवारीनुसार शेकडा एक हजार ते तीन हजार सहाशे रुपये या दरम्यान बाजारभाव मिळाला..उपबाजार आवारात १ लाख ४० हजार जुड्यांची आवक झाली होती, अशी माहिती बाजार समितीचे संचालक सारंग घोलप, उपसचिव शरद घोंगडे यांनी दिली. येथील उपबाजारात दररोज रात्री भाजीपाल्याचे लिलाव होतात. मार्चअखेर सुमारे अडीच हजार जुड्यांची आवक होत होती. एप्रिल महिना सुरू होताच पाणीटंचाई व तापमानात वाढ झाल्यामुळे कोथिंबीर व मेथीच्या जुड्यांची आवक घटली आहे. .Agriculture Market Updates: अहिल्यानगरला हिरवी मिरची, बटाट्याची आवक कायम.वाढलेल्या तापमानामुळे पेरणीनंतर कोथिंबीर व मेथीच्या बियांची उगवणक्षमतेत ५० टक्के घट झाली. यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने उपबाजारात जुड्यांची आवक घटली आहे. .Argentina Agriculture Market: अर्जेंटिनामध्ये फळे, प्रक्रिया उत्पादनांना मागणी.येथील लिलावात रोहित फुलसुंदर, समीर जाधव यांच्या कोथिंबिरीच्या जुड्यांना शेकडा अनुक्रमे चार हजार २००, तीन हजार ६०० रुपये असा वाढीव भाव मिळाला. रांजणी येथील शेतकरी विकास तळेकर यांच्या मेथीच्या जुडीला शेकडा १ हजार ६०० रुपये असा वाढीव भाव मिळाला, अशी माहिती व्यापारी कमलाकर वाजगे यांनी दिली..टोमॅटोचा क्रेट १५० ते ४०० रुपयेसंचालक सारंग घोलप म्हणाले, की टोमॅटो बाजार आवारात टोमॅटोची उन्हाळी आवक सुरू झाली आहे. बाजारात सुमारे १८ हजार क्रेटची आवक झाली होती. सकाळी झालेल्या लिलावात प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला (२० किलो) १५० ते ४०० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.