Chana Rate : नाफेडच्या बाजार हस्तक्षेपामुळे हरभरा दरात घसरण

नाफेडने त्यांच्याकडील खरेदी केलेला हरभरा खुल्या बाजारात विक्रीसाठी काढला आहे. परिणामी बाजारात हरभरा दरात घसरण नोंदविण्यात आली आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

नागपूर ः नाफेडने (NAFED) त्यांच्याकडील खरेदी केलेला हरभरा (Chana) खुल्या बाजारात विक्रीसाठी काढला आहे. परिणामी बाजारात हरभरा दरात (Chana Rate) घसरण नोंदविण्यात आली आहे. हरभरा दर गेल्या आठवड्यात ४१०० ते ४५७६ रुपये क्‍विंटल असताना या आठवड्यात ते ४००० ते ४४५० रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आले.

Chana Market
Chana Rate News : सणासुदीत हरभरा दर सुधारतील का ?

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात गेल्या आठवड्यात हरभरा आवक २७७ क्‍विंटल होती. या आठवड्यात ती २०० क्‍विंटलवर पोचली. बाजारात तुरीची आवक ९९ क्‍विंटल असून गेल्या आठवड्यात दर ६५०० ते ७३८० रुपये होते. या आठवड्यातील तुरीची आवक ७४ क्‍विंटल आणि दर ७२०० ते ७३०० रुपयांवर पोचले. बाजारातील तांदळाचे दर ४५०० ते ४८०० रुपये असून आवक ५० क्‍विंटलची होती. या आठवड्यात दर स्थिर होते तर आवक २० क्‍विंटलपर्यंत खाली आली. गहू आवक ३०० क्‍विंटलची झाली तर दर गेल्या आठवड्यात २३०० ते २३७६ आणि या आठवड्यात २३४४ ते २४०० रुपये होते.

बाजारात भुईमूग शेंगाची आवक नियमित असून ती जेमतेम ३० क्‍विंटलच्या घरात आहे. गेल्या आठवड्यात शेंगांना ४५०० ते ५००० रुपये असा दर होता. त्यानंतर दर ४००० ते ६००० रुपयांवर पोचले या आठवड्यात हे दर ४२०० ते ५००० रुपयांवर आले. सणासुदीला केळीच्या दरात तेजी अनुभवली जाते. ०६ सप्टेंबर रोजी १५०० ते १८०० रुपयांवर केळीचे दर होते. त्यानंतर मात्र ४५० ते ५०० रुपयांवर केळी स्थिर आहे. केळीची आवक ५३ क्‍विंटल इतकी आहे. डाळिंब आवक ११३९ क्‍विंटलची असून दर २००० ते ८००० रुपये होते. चिकूची देखील बाजारात नियमित आवक असून ती १२८ क्‍विंटल आहे. चिकूचे दर १५०० ते ३००० रुपये होते.

Chana Market
Chana Market : नाफेड खुल्या बाजारात हरभरा विक्री करणार

संत्रा-मोसंबीची आवक नियमित

बाजारात नागपुरी संत्र्यांची आवक देखील नियमीत सुरु आहे. सद्या मोठ्या आकाराच्या फळांची ३० क्‍विंटल, मध्यम २० तर लहान आकाराच्या फळांची १३ क्‍विंटल इतकी आवक आहे. १८०० ते २००० रुपये असा दर संत्र्याला होता. या आठवड्यात मोठ्या आकाराच्या संत्रा फळांच्या दरात तेजी येत हे दर २५०० ते ३००० रुपयांवर पोचले. मोसंबीच्या मोठ्या फळांची आवक १००० क्‍विंटल, मध्यम १०० तर लहान फळांची ५८ क्‍विंटल इतकी होती. मोसंबीच्या मोठ्या फळांना गेल्या आठवड्यात १८०० ते २६०० रुपये असा दर होता. या आठवड्यात हे दर २५०० ते २६०० रुपयांवर पोचले.

भाजीपाला बाजारपेठ

कळमना बाजारात बटाटा आवक वाढती असून ती २६२५ क्‍विंटलवर पोचली. बटाटा दर १५०० ते १८०० रुपये होते. कांदा आवक २६० क्‍विंटल तर दर १००० ते १५०० रुपये होता. लसूण दरात घट नोंदविण्यात आली असून याचे दर ५०० ते ४००० रुपयांवर होते. लसूण आवक २८० क्‍विंटलची आहे. आले आवक ५० क्‍विंटल तर दर ३६०० ते ४००० रुपये होते. वाळलेल्या मिरचीचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. ते १०००० ते १८००० रुपये असून आवक ५४४ क्‍विंटल आहे. टोमॅटोच्या दरात घसरण अनुभवण्यात आली. २५०० ते ३००० रुपयांवरून याचे दर २००० ते २२०० रुपयांवर आले होते. चवळी शेंगांची आवक ४० क्‍विंटलची असून दर या आठवड्यात ३५०० ते ४००० रुपयांवर होते. गेल्या आठवड्यात हे दर ५००० ते ६००० रुपये असे चढे होते. भेंडीचे व्यवहार ३००० ते ३५०० रुपयांनी झाले. भेंडीची आवक ११० क्‍विंटलची होती. हिरव्या मिरचीची आवक ६०० क्‍विंटलची असून दर ३००० ते ३२०० असा होता. या आठवड्यात मिरची दरात तेजी येत ते ४००० ते ४५०० रुपयांवर पोचले. ढोबळी मिरचीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घसरण नोंदविली गेली. गेल्या आठवड्यात ढोबळी मिरचीचे दर ४००० ते ५००० रुपये असा या आठवड्यात ते ३००० ते ४००० रुपयांवर पोचले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com