Agri Market Issue: बारदाना टंचाईमुळे गेल्या काही दिवसांपासून हरभऱ्याची हमीभावाने होणारी सरकारी खरेदी ठप्प झाली आहे. राज्यात आतापर्यंत पाच लाख टनाच्या आसपास हरभरा खरेदी झाली. सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी दीड लाख शेतकऱ्यांचाच हरभरा खरेदी करण्यात आला. निम्मे शेतकरी हरभरा विक्रीसाठी वाट बघत आहेत. हमीभाव खरेदीची मुदत २९ एप्रिल रोजी संपत असून खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत..बाजारात सध्या हरभरा आवक चांगली सुरू आहे. आवकेचा दबाव तसेच आयात यामुळे भाव हमीभावाच्या खाली आहेत. यंदा सरकारने हरभऱ्याला प्रति क्विंटल ५ हजार ८७५ रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारात सध्या सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील भाव हमीभावापेक्षा सुमारे १५ टक्के कमी आहेत. त्यामुळे हमीभावाने हरभरा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे..Chana Procurement Issue: बारदान्याअभावी हरभरा खरेदी अडचणीत.बारदाना टंचाईखरेदीची प्रक्रिया मात्र धीम्या गतीने सुरू आहे. हरभरा खरेदीसाठी केवळ ६० दिवसांचा कालावधी मिळाला. तसेच मागील काही दिवसांपासून बारदाणा टंचाई जाणवत आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रांमध्ये मागील दोन ते तीन आठवड्यांपासून बारदाना नसल्याचे सूत्रांनी सांगितले..Chana Procurement Delay: शेतकऱ्यांची हरभरा खरेदीसाठी प्रतीक्षा.राज्यात हरभरा आणि तूर खरेदीसाठी बारदाना टंचाई जाणवत आहे. मागील आठवडाभरापासून बहुतांशी खरेदी केंद्रांवर बारदाना टंचाईमुळे खरेदी ठप्प आहे. पणन मंडळ, मार्केटिंग फेडरेशन आणि व्हीसीएमएफ या सर्व संस्थांच्या केंद्रांमध्ये सध्या बारदाना उपलब्ध नाही..खरेदी कमीचराज्यात यंदा ७ लाख ६१ हजार टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. पण आतापर्यंत पाच लाख टनांच्या आसपास खरेदी झाली आहे. त्यापैकी नाफेडने २ लाख ४६ हजार टन, तर एनसीसीएफने ५३ हजार टन खरेदी केली. तर माॅडेल केंद्रांकडून दोन लाख टनांच्या आसपास खरेदी झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.