Sugar Quota: केंद्राची सावध पावले; जूनचा साखर कोटा अडीच लाख टनांनी घटविला

Government Policy: देशातील साखर उत्पादन घटल्याने केंद्र सरकारने यंदाच्या जूनसाठी साखर कोटा कमी केला आहे. मात्र पावसाळ्यामुळे मागणी घटण्याची शक्यता असल्याने दरात फारसा बदल होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Sugar Quota
Sugar QuotaAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: केंद्राने देशातील साखर कारखान्यांना यंदाच्या जून महिन्यासाठी २३ लाख टन कोटा दिला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हाच कोटा २५.५० लाख टन होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जूनमध्ये साखर कोट्यात तब्बल अडीच लाख टनांची घट झाली आहे. यंदा अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाल्याने केंद्राने पुढील हंगामात साखर पुरेशी शिल्लक राहावी यासाठी सावध पावले उचलताना साखर कोट्यात घट केली आहे.

पुढील चार महिने देशांतर्गत बाजारात पुरेशी साखर उपलब्ध होईल याबाबत दक्षता म्हणून कारखान्यांना जूनमध्ये कमी साखर कोटा दिल्याची माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी दिली. कोटा कमी दिला असला तरी पावसाळ्यामुळे साखरेच्या मागणीत घट येण्याची शक्यता असल्याने दर स्थिर राहतील असे साखर उद्योगातील साखर सूत्रांनी सांगितले. मे महिन्यात साखरेचे दर क्विंटलला ३७०० ते ३८०० रुपयांच्या दरम्यान स्थिर आहे

Sugar Quota
Sugar Quota: मे चा साखरविक्री कोटा घटवला

मेच्या पहिल्या पंधरवड्यात उनाची तीव्रता जास्त असल्याने शीतपेय व आईस्क्रीम उद्योगाकडून मागणी चांगली होती. दरात फार वाढ नसली तरी मागणी नियमित होती. यामुळे दरही स्थिर राहिले. गेल्या पंधरवड्यापासून विशेष करून महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरला. यामुळे उष्णतेचे प्रमाण कमी झाले. आता तोंडावर मॉन्सून असल्याने साखरेची विक्री उद्योगातून फारशी गतीने होणार नाही अशी चिन्हे आहेत. यामुळे जून महिन्यातही साखरेचे दर फारसे कमी अथवा वाढणार नाहीत, असे साखर उद्योगातील तज्ञांचे म्हणणे आहे.

पुढील हंगामाच्या प्रारंभी ६० लाख टनांपर्यंत साखर साठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. हा साठा नवीन हंगाम सुरू होईपर्यंत पुरेसा होऊ शकतो. यंदा महाराष्ट्रासह कर्नाटक व उत्तर प्रदेशातील उत्पादन लक्षणीय घटले. यामुळे केंद्राने गेल्या दोन महिन्यांपासून विक्री कोटे देताना विचारपूर्वक दिले आहेत. कमी कोटा दिल्यास स्थानिक बाजारात दर वाढतील या शक्यतेने यंदाचे वातावरण, उत्पादन याचा विचार करून जादा साखर कोटे विक्रीसाठी देण्याचे टाळले आहे

Sugar Quota
Sugar Industry : कारखान्यांकडील साखर मूल्यांकनात वाढ

गेल्या ऑक्टोबरपासून (२०२४) ते जून (२०२५) पर्यंतच्या साखर कोट्यावर नजर टाकल्यास ऑक्टोबरला सर्वाधिक २५.५० लाख टन साखरेचा कोटा दिला होता. यानंतर हंगाम भरात असताना कोट्याची मर्यादा २२ ते २२.५० लाख टनांवर ठेवली. मार्च सुरू झाल्यानंतर मात्र २३ टनापर्यंत कोटे दिले. उन्हाळ्यात मागणी असतानाही २३.५० लाख टनांच्या वर कोटा दिला नाही. २०२३-२४ ला मात्र मोठ्या प्रमाणात कोटे दिले.

गेल्या वर्षीची तुलना केल्यास प्रत्येक महिन्यात यंदा दीड ते दोन लाख टनाने साखर कोटा कमी दिला आहे. यंदा साखरेचे घटलेले उत्पादनच कोटा कमी देण्याचे मुख्य कारण आहे. पुढील हंगाम सुरू होईपर्यंत २२ ते २३ लाख टनांच्या आसपासच कोटे दिले जाण्याची शक्यता आहे.

केंद्राने जूनसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी कोटा दिला असला, तरी मागणीअभावी साखरेची भाववाढीची शक्यता कमी आहे. पावसाळा तोंडावर असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता तशी कमीच वाटते.
पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com