Cotton Market : शेतकऱ्यांची कापूस कोंडी

Cotton Procurement : भारतीय कापूस महामंडळाने यंदा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या केंद्रांना डावलले.
Cotton Market
Cotton Market Agrowon
Published on
Updated on

Chandrapur News : भारतीय कापूस महामंडळाने यंदा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या केंद्रांना डावलले. त्याचा परिणाम या भागातील शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करावी लागत आहे.

शासनाने कापसाला ७०२० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारात ६५०० ते ६७०० रुपये भाव आहे. दुसरीकडे जाऊन कापसाची विक्री करणे म्हणजे वाहतुकीचा खर्च आला. या साऱ्या प्रकाराने शेतकऱ्यांची कापूस कोंडी झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात धान, सोयाबीन, कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. धानानंतरचे सगळ्यात जास्त क्षेत्र कापसाचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कपाशीचे पेरणीक्षेत्र १ लाख ६९ हजार ९३६ हेक्टर आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस आला. हा पाऊस कापसाला पोषक ठरला.

Cotton Market
Cotton Market : कापूस, हरभरा, मूग, हळदीच्या किमतींत घट

त्यामुळे चांगला भाव कापसाला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या जिल्ह्यात कापूस वेचणी सुरू आहे, तर काही ठिकाणी वेचणी झाली आहे. त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीच्या तयारीत आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या माध्यमातून कापूस खरेदी होते. यासाठी सीसीआय खरेदी केंद्र देते.

या केंद्रावर शेतकऱ्यांना कापूस विक्री करता येतो. सीसीआय दरवर्षी चंद्रपूर, वरोरा, राजुरा आणि कोरपना ही केंद्रे देत होती. मात्र, यावर्षी चंद्रपूरला वगळण्यात आले. चंद्रपूरला वगळण्याचे काही कारण सीसीआयने स्पष्ट केले नाही. त्यामुळे चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस कुठे विकायचा हा प्रश्न पडला आहे.

Cotton Market
Cotton Market : खानदेशात कापूस दर दबावात

मागीलवर्षी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रासबिहारी अॅग्रो आणि मारोती कॉटन येथे कापूस विक्री केंद्र दिले होते. जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली. एक लाख ३० हजार ते एक लाख चाळीस हजार क्किंटल कापसाची विक्री झाली होती.

खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकण्याची वेळ

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या केंद्रातून मोठ्या प्रमाणावर कापसाची विक्री झाली. त्यामुळे चंद्रपूरला सीसीआयने केंद्र देणे अभिप्रेत होते. मात्र, यंदा चंद्रपूरला सीसीआयने डावलले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना भद्रावती, वरोरा, राजुरा किंवा कोरपन्यात जाऊन कापूस विक्री करावा लागणार आहे. तिथे जाणे शक्य नसल्याने खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com