Global Trade Update: गेल्या काही दिवसांपासूनची पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि त्यामुळे कडाडलेले इंधनाचे दर, याचे पडसाद आता जागतिक साखर बाजारात उमटू लागले आहेत. या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधन महागल्याने अनेक देश पर्यायी ऊर्जास्रोतांकडे वळत आहेत. .विशेषतः जैवइंधन (इथेनॉल) उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामात (२०२६-२७) सर्वांत मोठा साखर उत्पादक आणि निर्यातदार देश असलेल्या ब्राझीलमध्ये ऊसापासून साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती वाढविण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. एप्रिलपासून ब्राझीलमध्ये साखरेचा नवा हंगाम सुरू होत असून, तिथल्या धोरणात्मक बदलांचा परिणाम जागतिक साखर पुरवठ्यावर होणार आहे..Ethanol Blending: इथेनॉल ब्लेंडिंग वाढविण्याचे सरकारला आवाहन.कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे ब्राझीलमधील कारखानदार उसापासून साखर तयार करण्याऐवजी इथेनॉल निर्मितीला पसंती देण्याची दाट शक्यता तेथील साखर उद्याेगातील संघटनांनी वर्तवली आहे. ब्राझीलमध्ये एप्रिलपासून नव्या गाळप हंगामाची सुरुवात होत आहे. जर ब्राझीलने इथेनॉलचे उत्पादन वाढवले, तर जागतिक बाजारपेठेत साखरेची उपलब्धता कमी होईल, परिणामी साखरेच्या जागतिक किमतीत वाढ होऊ शकते..Ethanol Fuel: इथेनॉल; इंधन स्वयंपाकाचे!.गेल्या वर्षी ब्राझीलकडून सुमारे ३३० लाख टन साखर निर्यात झाली होती. मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे यंदा ही निर्यात २९० लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. केवळ निर्यातच नव्हे, तर एकूण उत्पादनातही मोठी तूट दिसून येईल, असाही अंदाज आहे. गेल्या हंगामात ब्राझीलमध्ये ४३० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यात घट होऊन उत्पादन ४०० लाख टनांपर्यंत सीमित राहू शकते..भारतासाठी काय संकेत?ब्राझीलच्या उत्पादनातील घट आणि जागतिक निर्यातीत येणारी घट यामुळे भारतीय साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी राहू शकते. मात्र, देशांतर्गत इथेनॉल मिश्रण कार्यक्रम आणि साखरेचे दर स्थिर ठेवण्याचे आव्हान सरकारसमोर असेल. जागतिक बाजारातील ही उलथापालथ येणाऱ्या काळात साखर उद्योगाची समीकरणे बदलून टाकणारी ठरू शकते, असा साखर उद्योगाचा अंदाज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.