Chana Market : ऑस्ट्रेलियाचा हरभरा भारतीय बाजारात जानेवारीत येणार

Chana Update : ऑस्ट्रेलियात बंपर उत्पादन झालेल्या कमी दरातील हरभऱ्याच्या सौद्यांवर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात येत्या काळात हरभऱ्याचे दर दबावात राहतील.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : ऑस्ट्रेलियात बंपर उत्पादन झालेल्या कमी दरातील हरभऱ्याच्या सौद्यांवर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात येत्या काळात हरभऱ्याचे दर दबावात राहतील, अशी भीती वर्तविली जात आहे. रब्बी हंगामातील हरभरा बाजारात येण्यास दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार आहे. अशातच जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाचा हरभरा बाजारात येणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये यंदा हरभऱ्याचे बंपर उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच मोठ-मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ऑस्ट्रेलियातून भारताला हरभरा पाठविण्यावर भर दिला आहे. यंदा पहिल्यांदाच गेल्या एक दशकाच्या तुलनेत हरभऱ्याचा दर्जा आणि उत्पादन चांगले असल्याने ऑस्ट्रेलियाशी हरभऱ्याकरिता व्यापारी स्तरावर आगाऊ सौदे केले जात आहेत. त्यामुळेच येत्या काळात हरभऱ्याचे दर बाजारात दबावात राहतील, अशी भीती वर्तविली जात आहे.

Chana Market
Chana Pest : हरभरा पिकावर ‘कटवर्म’चा प्रादूर्भाव

बाजार विश्‍लेषकांच्या मते, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हरभऱ्याचे भाव आठ हजार रुपये प्रति क्‍विंटलच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. या दरात आता दहा टक्‍के घट नोंदविण्यात आली आहे. दिल्ली बाजारात मे महिन्याच्या सुरुवातीला हरभऱ्याचे दर ६३०० रुपयांवर होते. सप्टेंबरपर्यंत त्यात वाढ होत हे दर ८००० रुपयांच्या पुढे गेले. आता त्यात घट होत हेच दर ७२०० रुपये प्रति क्‍विंटलच्या जवळपास आहेत.

त्याच वेळी ऑस्ट्रेलियातून आयातील हरभऱ्याचे व्यवहार मुंबई परिसरातील बाजार समित्यांमध्ये ७२०० ते ७३०० रुपये प्रति क्‍विंटल प्रमाणे होत आहेत. दरम्यान, टांझानिया भागातील हरभरा ६५०० ते ६६०० रुपयांनी उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय बाजारात हरभरा दर दबावात राहतील अशी भीती आतापासूनच व्यक्त केली जात आहे.

Chana Market
Chana Market : हरभरा वायदे सुरू करण्यासाठी दबावगट हवा

सर्वाधिक आयात ऑस्ट्रेलियातून

बाजार विश्‍लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा एप्रिल-ऑगस्ट या महिन्यांच्या कालावधीत ०.८७ लाख टन हरभरा आयात करण्यात आला. त्यामध्ये ऑस्ट्रेलियातून आयात हरभऱ्याचे प्रमाण ७५ हजार टन इतके होते. येत्या काळात ऑस्ट्रेलियातून होणारी हरभरा आवक वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियातून हरभरा आवक होईल, असे सांगण्यात आले. जानेवारी अखेरीस रब्बी हंगामातील हरभरादेखील बाजारात दाखल होणार आहे.

शासनाने सर्वच शेतीमाल आयात करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. शासनाला शेतीमाल आयातच करायचा असेल तर भारतीय शेतकऱ्यांना देखील पर्यायी रोजगार आणि त्यांना अन्नसुरक्षांतर्गत धान्याची उपलब्धता करावी. त्यांना शेतीकरणे सोडून द्यावे, असे सांगून मोकळे करावे.
दिलीप फुके, प्रयोगशील शेतकरी, चांभई, वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com