Papaya Rate : खानदेशात खरेदीदारांकडून पपई दर पाडण्याचा प्रयत्न

खानदेशात पपई दर अलीकडेच साडेबारा रुपये प्रतिकिलोवरून १७ रुपये प्रतिकिलो, असा जागेवर शेतकऱ्यांना शिवार खरेदीत मिळत आहे.
Papaya Rate
Papaya Rate Agrowon
Published on
Updated on

Papaya Market जळगाव ः खानदेशात पपई दर (Papaya Rate) अलीकडेच साडेबारा रुपये प्रतिकिलोवरून १७ रुपये प्रतिकिलो, असा जागेवर शेतकऱ्यांना शिवार खरेदीत मिळत आहे.

परंतु काही नफेखोर खरेदीदार, एजंट हे अधिकची आवक (Papaya Arrival), दर्जा असे मुद्दे उपस्थित करून दर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दर कमी केल्यास काढणी (Papaya Harvesting) बंद करू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

पपईची आवक मागील आठ ते १० दिवसांत मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या खानदेशात उष्णता वाढत आहे, परंतु उत्तर भारतात थंड वातावरण आहे. पंजाब, दिल्ली, हरयाना, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पपईला मोठी मागणी आहे.

पण आवक मागील हंगामाच्या तुलनेत सध्या निम्मीही नाही. सध्या प्रतिदिन ६० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) पपईची आवक खानदेशात होत आहे. मागील हंगामात आवक फेब्रुवारीतही अधिक होती.

यंदा अनेक शेतकऱ्यांच्या पपईचे पीक विषम वातावरण व रोगराईने काढावे लागले आहे. यामुळे आवक कमी झाली आहे.

Papaya Rate
Papaya Rate : खानदेशात पपई दर स्थिर

उत्तर भारतासह मुंबई, पुणे, ठाणे आदी भागातही पपईला उठाव आहे. पपईचे दर या महिन्याच्या सुरवातीला साडेबारा रुपये प्रति किलो, असे शेतकऱ्यांना शिवार किंवा थेट खरेदीत मिळत होते.

त्यात मागील आठवड्यातच वाढ झाली आणि दर १७ रुपये प्रति किलो, असा जागेवर निश्चित करण्यात आला. याबाबत शहादा (ता. नंदुरबार) येथे शेतकरी, खरेदीदार व बाजार समिती प्रशासनाची बैठक झाली होती.

Papaya Rate
Papaya : पपईसाठी बिहार राज्य सरकार देणार अनुदान

या दरांना सर्वांनी सहमती दिली होती. परंतु जळगाव, धुळे भागात काही एजंट, खरेदीदार यापेक्षा कमी दरात पपई खरेदीचा प्रयत्न करीत आहेत. दर्जा, कमी मागणी, अशी कारणे सांगत आहेत.

आवक कमी असताना असा प्रकार खानदेशात सुरू आहे. यास चोपडा, धुळ्यातील शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

पपईचे दर १७ रुपये व त्यापेक्षा अधिकच असायला हवेत. कारण पीक परवडत नसल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. दर कमी केल्यास काढणी बंद करू, अशी एकी शेतकऱ्यांनी केल्याची माहिती शेतकरी नरेंद्र पाटील (लोणी, ता. चोपडा, जि. जळगाव) यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com