Amravati News : तापमानात वाढ होण्यासह बाजारात कच्च्या आंब्यांची (कैरी) आवक वाढली आहे. सध्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या भागातून आवक होत असून ती १६० क्विंटल आहे. लालपट्टा वाणाची आवक देखील १५० क्विंटल आहे. पुढे आवक वाढेल, अशी शक्यता आहे. आंब्याला ५००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितली.
तापमानात वाढ होताच कलिंगड, खरबूज तसेच कैरीची आवक वाढीस लागते. त्यानुसार अमरावती बाजारात गेल्या पंधरवड्यापासून आंध्रप्रदेश तसेच तेलंगणा परिसरातून बैगणफल्ली आंब्यांची आवक होत आहे. या आंब्याचे सरासरी दर ५००० ते ७००० रुपये असून मागणी देखील चांगली असल्याचे सांगण्यात आले.
सध्या बैगणफल्ली आंब्यांची आवक १६० क्विंटल आहे. आंबा फळावर लालपट्टा असलेल्या विशिष्ट आंबा वाणाची आवक देखील अमरावती बाजारात सुरू आहे. याची आवक देखील बैगणफल्ली प्रमाणे सरासरी १५० क्विंटल आवक आहे. याचे दर मात्र बैगणफल्लीच्या तुलनेत प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी कमी आहेत. लालपट्टा आंब्याला ४५०० ते ६५०० रुपयांचा दर मिळत आहे.
कलिंगड, खरबुजांची आवक सुरू
कलिंगड आणि खरबुजांची देखील बाजारात आवक सुरू आहे. कलिंगडास १२०० ते १५०० रुपये क्विंटल दर आहेत. खरबुजांची व्यवहार १५०० ते १८०० रुपयांनी होत आहेत.
स्थानिक कैऱ्यांची आवक, दर कमी
कळमना बाजारात स्थानिक शेतकऱ्यांव्दारे कैरीची देखील आवक होत आहे. कैरीचे दर ३००० ते ४००० रुपये असून आव अवघी ६० क्विंटल इतकी आहे. या ठिकाणी दरात सातत्याने चढ-उतार होत असून दोन दिवसांपूर्वी २५०० ते ४००० रुपये क्विंटलचा दर असताना आता ४००० ते ५००० रुपयांचा दर कैरीला मिळत आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमधूनच कैरीची आवक होते, असे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.