Maize Market : मका निर्यात वाढली; दर वाढतील का?

यंदा जागतिक मका उत्पादन ५ टक्क्यांनी कमी राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने व्यक्त केला.
Maize
MaizeAgrowon
Published on
Updated on

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला चांगली मागणी (International Market Demand in Maize) आहे. दरही (Maize Rate) तेजीत आहेत. त्यामुळे भारतातून मका निर्यात (Maize Export) वाढली. सध्या देशातील बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत.

पुढील दीड महिन्यात रब्बीतील मका (Maize) बाजारात येईल. मात्र निर्यातीसाठी मागणी असल्याने मक्याचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

यंदा जागतिक मका उत्पादन ५ टक्क्यांनी कमी राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने व्यक्त केला. जागतिक पातळीवरील मका उत्पादन ११ हजार ५१३ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज आहे.

गेल्या हंगामातील उत्पादन १२ हजार १६० लाख टन होतं. त्यातच रशिया आणि युक्रेन युध्दामुळे मका पुरवठा साखळी विस्कळीत झाली.

यंदा अमेरिका, अर्जेंटीना, रशिया आणि युक्रेन या महत्वाच्या दशांमधील मका उत्पादन घटलं. अमेरिकेतील उत्पादन यंदा ४११ लाख टनानं कमी झालं. तर अर्जेंटीनात २५ लाख टन, रशियात १२ लाख टन आणि युक्रेनमधील मका उत्पादन १५१ लाख टनांनी घटल्याचं युएसडीएनं म्हटलं आहे. 

Maize
Podcast TItle: मका उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज | Agrowon

जगातील या महत्वाच्या देशांमधील मका उत्पादन घटले. त्यातच पुरवठा साखळीतील अडचणी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि वाढलेल्या मागणीमुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर तेजीत आहेत.

तसचं रशिया आणि युक्रेन युध्द, अमेरिकेतील उशीरा झालेली लागवड आणि दक्षिण अमेरिकेतील कमी पाऊस यामुळे मका दराला आणखी आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर वाढल्यानं भारतातूही निर्यात वाढल्याचं सांगली येथील मका प्रक्रियादार अभिजित नाईक यांनी सांगितलं. 

मका निर्यात

मागील हंगामात भारतानं जवळपास ३७ लाख टन मका निर्यात केली होती. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये जवळपास २० लाख टन निर्यात झाली. मात्र नोव्हेंबरनंतर मका निर्यातीचा वेग जास्त होता, असं निर्यातदारांनी सांगितलं.

देशातील मक्याचे भाव

मक्याला निर्यातीसाठी मागणी वाढल्यानं दरातही महिनाभरात वाढ झाली. सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याला प्रतिक्विंटल २ हजार ते २ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तर निर्यातीसाठी मक्याचे दर २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

सध्या भारताला आग्नेय आशिया आणि पूर्व आशियातील देशांना निर्यातीसाठी वाहतूक खर्च कमी लागत आहे. त्यामुळं या देशांना मका निर्यात वाढली.मक्याला सध्या निर्यातीसाठी मागणी असल्यानं यंदा दर टिकून राहतील, असं मका बाजारातील जाणकार शांतीलाल बाफणा यांनी सांगितलं.  

दर टिकून राहतील

भारताचा मका आंतरराष्ट्रीय बाजारात ३१० डाॅलर प्रतिटन पडतो. यापुर्वी हा भाव २९० डाॅलर होता. पण वाहतूक खर्च कमी झाल्यानं व्हिएनाम, मलेशिया आणि ओमान देशांमध्ये निर्यात वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला मागणी असल्यानं दरही तेजीत आहेत.

तसचं देशातील मका उत्पादन अंदाजापेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. सोयापेंड आणि इतर पेंडेचे दर सध्या काहीसे अधिक आहेत. त्यामुळं मक्याला चांगला उठाव मिळेल. या स्थितीत रब्बीतील मक्याची आवक वाढली तरी सध्याच्या भावात जास्त नरमाई दिसणार नाही, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला.

Maize
Maize Processing : विविध प्रक्रिया उद्योगात मका उपयुक्त कसा?|Agrowon | ॲग्रोवन
रब्बीतील मका पिकाची स्थिती चांगली आहे. मात्र निर्यातही वाढत आहे. सध्या निर्यातीसाठी चांगली मागणी असल्याने मक्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत. बाजारात मक्याची आवक वाढली तरी सध्याच्या दरावरून १०० रुपयांपेक्षा जास्त नरमाई दिसणार नाही.
शांतीलाल बाफणा, शेतीमाल बाजार अभ्यासक, मध्य प्रदेश
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्याने यंदा मका निर्यात २० ते २५ टक्क्यांनी वाढू शकते. पुढील एक ते दीड महिन्यात बाजारात रब्बीतील मक्याची आवक सुरु होईल. या काळात मक्याचे सध्याचे दर काही दिवस दबावात येऊ शकतात. पण दबाव जास्त दिवस राहणार नाही.
अभिजित नाईक, मका प्रक्रियादार, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com