Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Market Rate : कापसाचे भाव कोण दबावात ठेवत आहेत?

Cotton Bajarbhav : देशातील बाजारात सध्या कापसाला हंगामातील सर्वात कमी भाव मिळत आहे. पण देशातील कापूस उत्पादन यंदा कमी झाले.
Published on

Cotton Production : देशातील बाजारात सध्या कापसाला हंगामातील सर्वात कमी भाव मिळत आहे. पण देशातील कापूस उत्पादन यंदा कमी झाले. त्यामुळे दर दबावात नको होते. पण उद्योग जाणूनबुजून दर दबावात ठेवत आहेत, असे जाणकारांनी सांगितले.

देशातील बाजारात कापसाचे भाव दबावात आहेत. सध्याची कापसाची भाव पातळी हंगामातील सर्वात नीचांकी आहे. मे महिन्यात हंगामातील सर्वात कमी दर राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अभ्यासक सांगत आहेत.

कापसाला सध्या प्रतिकिंटल ७४०० ते ८ हजार रुपये भाव मिळत आहे. अनेक बाजारांमध्ये कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. याचा दबाव दारावर येत आहे. सध्या कापूस दरावर केवळ अवकेचा दबाव असल्याचे जाणकार सांगत आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने शेतकरी कापसाची विक्री करत आहेत.

खरिपाच्या लागवडी तोंडावर आल्याने शेतकरी कापूस विकत आहेत. मे महिन्यात कापसाला किमान चांगला भाव तरी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला होता. पण शेतकरी जास्त दिवस कापूस ठेऊ शकत नाहीत हे ओळखून बाजार दबावात ठेवण्यात आला.

Cotton Market
Desi Cotton Seed Shortage : देशी, सरळ कापूस वाणांची टंचाई वाढणार

परिणामी शेतकऱ्यांना सध्या हंगामातील सर्वात कमी भाव मिळत आहेत. कापसाचे भाव वाढण्या ऐवजी कमी होत आहेत. कापसाचे पुन्हा वाढणार नाहीत, अशी चर्चाही बाजारात पसरवली जात आहे. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विकत आहेत.

शेतकरी कापूस विकत असल्यानेच भाव वाढत नाहीत. भाव कमी झाल्यानंतरही शेतकरी कापूस विकत आहेत. यामुळे उद्योगांकडून कापूस भाव वाढवले जात नाहीत. तर भाव आणखी कमी होण्याच्या भीतीने शेतकरी विक्री वाढवत आहेत. परिणामी बाजारात कापसाचे भाव दबावात आहेत.

तस पाहिलं तर कापसाचे भाव वाढण्यास अनुकूल स्थिती आहे. देशातील कापूस उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी झाले. मागील हंगामात देशात ३०७ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा उत्पादन २९८ लाख गाठी झाले. तर देशातील कापूस वापर ३११ लाख गाठी राहील, असाही अंदाज आहे. म्हणजेच यंदाचे उत्पादन वापरापेक्षा कमी आहे.

गेल्या वर्षीचा शिल्लक साठाही कमी होता. तर पुढील वर्षीही साठा कमी राहील. म्हणजेच देशात कापसाचे वाढण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. पण जाणूनबुजून कापूस बाजार दबावात ठेवला जातोय, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com