Cotton Rate : देशातील बाजारात सध्या कापूस उत्पादनाच्या चर्चेला ऊत आला. यंदा विविध संस्थांच्या अंदाजांमध्ये मोठा फरक दिसतो. यामुळं बाजारात संभ्रम आहे. काहींच्या मते यंदा कापूस उत्पादन (Cotton Production) गेल्यावर्षीपेक्षा कमी झालं, तर काहींच्या मते उत्पादन जास्त आहे. पण या सगळ्या भानगडीत शेतकरी पिचला जातोय.
यंदा देशातील कापूस उत्पादनाबाबत संभ्रामाची अवस्था आहे. यंदा विविध संस्थ्यांच्या कापूस उत्पादन अंदाजांमध्ये मोठी तफावत दिसते. चालू आठवड्यात काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआय आणि कापूस उत्पादन आणि वापर समिती म्हणजेच सीसीपीसीने आपले अंदाज जाहीर केले.
या दन्ही संस्था देशातील कापूस व्यापारी, उद्योग आणि निर्यातदरांचे प्रतिनिधीत्व करतात. तर सीसीपीसीमध्ये शेतकरी प्रतिनिधींचाही समावेश असतो, असं म्हणतात.
सीएआयने आपल्या अंदाज ३०३ लाख गाठींपर्यंत कमी केला. तर सीसीपीसीने देशातील कापूस उत्पादन ३३७ लाख गाठीवर राहीलं, असं म्हटलंय. दोन्ही संस्थांच्या अंदाजात तब्बल ३४ लाख गाठींची तफावत आहे. या अंदाजामुळं बाजारात संभ्रम निर्माण झाला.
शेतकरी आणि जाणकारांच्या मते सीएआयचा अंदाज खरा ठरू शकतो. तर मल्टी नॅशनल कंपन्यांच्या मते यंदा सीसीपीसीचा अंदाज खरा आहे.
यंदा बाजारात कापूस अंदाजाबाबत खूप चर्चा आहे. मल्टी नॅशनल कंपन्या यंदा उत्पादन चांगलं असल्याचं सांगत आहेत. तर शेतकऱ्यांच्या मते यंदा उत्पादनात मोठी घट झाली.
एरवी मार्च महिन्यापर्यंत बहुतांशी कापूस बाजारात येतो. त्यामुळं मार्चमध्येच उत्पादनाबाबतच चित्र स्पष्ट होतं. पण मागील हंगामात कापासाला विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळं यंदा शेतकऱ्यांनी कापूस माग ठेवला. बाजारातील आवक कमी असल्यानं उत्पादनाचा अंदाजही बांधता येत नाही. त्यामुळं यंदा उत्पादनाबाबत संभ्रम दिसतो.
कापूस उत्पादनाचे अंदाज वेगवेगळे असल्यामुळं बाजाराची नक्की दिशाही ठरत नाही. तसचं शेतकऱ्यांकडे सध्या किती कापूस आहे, यावरूनही मतभेद आहेत. उद्योग सांगतात त्याप्रमाणं ३५ ते ४० टक्के कापूस शिल्लक नसल्याचं शेतकरी सांगतात.
शेतकरी आणि जाणकारांच्या मते शेतकऱ्यांकडे सध्या २० टक्क्यांपर्यंत कापूस असू शकतो. काही भागात याचं प्रमाण कमीजास्त आहे. पण सरासरी २० टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे, असं म्हणायला हरकत नाही.
सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपये भाव मिळतोय. मागील आठवड्यात कापूस दरात सुधारणा पाहयला मिळाली होती. चालू आठवड्यात सीएआयाने कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करूनही दरात तेजी आली नाही किंवा दर सुधारले नाहीत.
मागील हंगामातही कापूस उत्पादन कमी होतं. त्यामुळं मार्च महिन्यानंतर कापूस दरात मोठी तेजी आली होती. यंदा तर गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन कमी झालं. मग एप्रिल सरत असतानाही दरात अपेक्षित दरवाढ का झाली नाही, हा प्रश्न कायम राहतो. त्यासाठी तीन शक्यता सांगतल्या जातात.
एक तर उत्पादन जास्त असल्यामुळं दर वाढले नाही. दुसरं म्हणजे उद्योग सांगतात त्याप्रमाणं खरचं कापडाला मागणी नाही. त्यामुळं कापड, सूत आणि कापसाचे भाव दबावात आहेत. तिसरं म्हणजे खरचं कापूस उत्पादन कमीच आहे, पण उद्योग लाॅबिंग करून भाव दबावात ठेवत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.