Urad Market Update : देशातील बाजारात सध्या उडदाचे भाव तेजीत आहेत. ग्लोबल पल्सेस काॅनक्लेवमध्ये जागतिक उडीद उत्पादन (urad production) यंदा वापरापेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उडदाच्या दारतील तेजी टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. सध्या उडदाला बाजारात ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
यंदा देशातील उडीद उत्पादनात मोठी घट झाल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. देशात यंदा २६ लाख टन उडीद उत्पादन झाल्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला. यंदा पहिल्यांदाच केंद्राने उन्हाळी हंगामातील उत्पादनही गृहीत धरले आहे.
गेल्या हंगामात देशात जवळपास २८ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा खरिपातील उत्पादन १८ लाख टन होते. जे मागील खरिपातील तुलनेत ६५ हजार टनांनी कमी होते. तर रब्बीतील उत्पादन जवळपास निम्म्याने कमी होऊन ५ लाख ४१ हजार टनांवर आले, असे सरकारने स्पष्ट केले.
ग्लोबल पल्सेस काॅनक्लेव अर्थात जीपीसीमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा भारतातील उडदाचे उत्पादन २१ लाख टनांवर स्थिरावले. तर म्यानमारमध्ये ७ लाख ५० हजार टन उडीद झाला. इतर देशात उडीद उत्पादनाचे प्रमाण कमी आहे.
जीपीसीच्या मते यंदा जागतिक पातळीवर २८ लाख ६० हजार टनांवर पोचले. मागील हंगामात २७ लाख १० हाजर नटांवर उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदाचे उत्पादन सव्वा लाख टनाने वाढले.
भारतात पुरवठा कमी
उडीद वापराचा विचार करता यंदा भारतात २५ लाख टनांचा वापर होणार आहे. तर पाकिस्तानमध्ये जवळपास एक लाख टनांचा वापर होईल. तर बांगलादेश, युईए, नेपाळ आणि इतर देशांमध्ये मिळून २७ लाख १० हजार टनांचा वापर होणार आहे.
म्हणजेच जीपीसीच्या मते यंदा जगात उडीद उत्पादनाच्या तुलनेत वापर कमी आहे. पण भारताचा विचार करता उत्पादनापेक्षा वापर ४ लाख टनांनी अधिक राहील.
पुढचा अंदाज काय?
भारतात यंदा उत्पादनापेक्षा वापर जास्त राहण्याचा अंदाज आहे. बाजारात सध्या पुरवठा कमी आहे. परिणामी उडदाचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीत आहेत. सध्या उडदाला बाजारात ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
खरिपाचे उत्पादन हाती येईपर्यंत उडदाचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.