Chana Production : देशात यंदा विक्रमी हरभरा उत्पादन होईल का?

सरकारने हरभरा लागवडीची जी आकडेवारी दिली त्यावरूनही मत मतांतरे आहेत. व्यापाऱ्यांच्या मते देशात सरकारच्या आकड्यांपेक्षा कमी लागवड आहे.
Chana Sowing
Chana SowingAgrowon

Chana Market Update : भारतात मागील हंगामात १३५ लाख टन हरभरा उत्पादन (Chana Production) झाले होते. देशातील उत्पादनाचा हा विक्रम होता. यंदा सरकराने यापुढे जाऊन १३६ लाख टन हरभरा (Chana Rate) उत्पादनाचा अंदाज जाहीर केला.

पण गेल्यावर्षी साध्य झाले ते यंदा कठिण वाटत आहे. यंदा फेब्रुवारीपासूनच वाढलेली उष्णता उत्पादन वाढीच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे.

गेल्या काही वर्षांचा ट्रेन्ड पाहता भारतात हरभरा उत्पादन वाढतच गेल्याचे दिसते. देशात २०१६-१७ मध्ये हरभरा उत्पादन जवळपास ९४ लाख टन होते. तर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच २०१७-१८ मध्ये हरभरा उत्पादनाने ११३.८ लाख टनांचा टप्पा गाठला.

मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी उत्पादन पुन्हा घटले. मात्र त्यानंतर उत्पादनात सतत वाढच होत गेली. २०२०-२१ मध्ये उत्पादनाने ११९ लाख टनांचा टप्पा गाठला होता.

Chana Sowing
Chana Procurement : हरभरा विक्रीपूर्व नोंदणीचे पोर्टल अद्याप सुरू नाही

मागील हंगामात देशातील हरभरा लागवड (Chana Cultivation) वाढली. तसेच वातावरणही पोषक होते. त्यामुळे विक्रमी उत्पादन झाले. गेल्या हंगामात देशात १३५ लाख ४४ हजार टन हरभरा उत्पादन झाले होते. हे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन होते.

तर यंदा विक्रमी १३६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता सरकारने आपल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात व्यक्त केली. असे झाल्यास हा उत्पादनाचा नवा विक्रम ठरेल. मात्र सरकारच्या या उत्पादनाविषयी यंदा शंका उपस्थित केली जात आहे.

उत्पादनाबाबत मतभेद

देशातील लागवड आणि सिंचनाची उपलब्धता, पाऊस आणि गारपीटचा फटका नसल्याने सरकारने यंदा १३६ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मागील वर्षी १३५ लाख टन उत्पादन होते. मात्र जाणकार आणि उद्योगाला यंदाही सरकारचा हा अंदाज मान्य नाही.

सरकारने हरभरा लागवडीची जी आकडेवारी दिली त्यावरूनही मत मतांतरे आहेत. व्यापाऱ्यांच्या मते देशात सरकारच्या आकड्यांपेक्षा कमी लागवड आहे. त्यातच वाढलेल्या तापमानाचाही फटका हरभरा पिकाला बसत आहे. जाणकारांच्या मते यंदा १०० ते १०५ लाख टनांपर्यंत हरभरा उत्पादन होईल.

Chana Sowing
Chana Market : हरभरा खरेदीसाठी जाहीर उत्पादकता अडचणीची ठरणार

फेब्रुवारीत बसला फटका

देशात फेब्रुवारी महिन्यात १९०१ नंतरचे सर्वाधिक उष्ण तापमान होते. फेब्रुवारी महिन्यात तापमान जास्त राहिल्याचा फटका हरभरा पिकाला बसत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात हरभरा पिकाची उत्पादकता कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फेब्रुवारीत तापमान जास्त राहिल्यानं हरभरा उत्पादकता १० ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मार्च महिन्यात तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे. मागीलवर्षी मार्च महिन्यात विक्रमी तापमान होते. यंदाही ऊन चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

यंदा मार्च महिन्यातही हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हामुळं हरभऱ्याची पक्वता वेळेआधीच होत आहे. त्यामुळे उत्पादकता कमी राहत आहे, असे शेतकरी सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com