Cotton Market : कापड निर्यात वाढली; कापूस, सूत निर्यातही वाढेल: पीयूष गोयल

देशातून कापड निर्यात वाढविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सरु आहेत. मी सतत एक्सपोर्ट प्रमोशन काउंसीलच्या संपर्कता आहे. काउंसीलकडून सरकार अद्यावरत माहिती देत आहेत.
Cotton Rate News Updates
Cotton Rate News UpdatesAgrowon

Cotton Rate : कोरोना काळात भारतातून कापड निर्यात (Textile Exports) घटली होती. तसेच इतर देशांना विदेश चलन टंचाई होती त्याचाही फटका बसत होता. मात्र आता भारतातून कापड निर्यात वाढत आहे. असे वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Minister Piyush Goyal) यांनी सांगितले.

पण कमी विकसित असल्याने बांगलादेशला कापड निर्यातीत जास्त फायदा होतो, असेही मंत्री गोयल यांनी सांगितले.

मंत्री गोयल म्हणाले की, देशातून कापड निर्यात वाढविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सरु आहेत. मी सतत एक्सपोर्ट प्रमोशन काउंसीलच्या संपर्कता आहे. काउंसीलकडून सरकार अद्यावरत माहिती देत आहेत. देशातील शिल्लक साठ्याचा वापर झाला. त्यामुळं शिल्लक साठा जवळपास संपला.

अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही आता पूर्वपदावर येत आहेत. माझ्या मते जगाला आता काही संकटं आणि समस्येत जगाण्याची सवय झाली. त्यामुळे या संकटाच्या काळातही देशातून निर्यात वाढत असल्याचे दिसते.

Cotton Rate News Updates
Marathwada Soybean Rate: मराठवाड्यातील कोणत्या बाजारात सोयाबीनचे दर सर्वाधिक राहिले?

रशिया-युक्रेन युध्दामुळे अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या देशांनी अत्यावश्यक वस्तु आणि सेवा वगळता इतर वस्तु आयात थांबवली.

तर अनेक देशांना रशिया आणि युक्रेन युध्दानंतर विदेशी चलन टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक देशांनी फक्त अत्यावश्यक वस्तुंचीच आयात केली, असेही गोयल यांनी सांगितले.

इतर देशांच्या विदेशी चलन टंचाईचा फटका

भारताने इजिप्तला शेकडो कंटेनर्समधून वस्तू निर्याती केली. पण इजिप्तला विदेशी चलनाची टंचाई होती. त्यामुळे हे कंटेनर्स आपल्याला परत आणावे लागले.

कोरनानंतर मागणी काहीशी वाढू लागली होती. पण रशिया आणि युक्रेन युध्दामुळे पुन्हा समस्या निर्माण झाली. त्याचा फटका कापड, हिरे, सोने या वस्तु निर्यातीवर होत आहे, असेही मंत्री गोयल यांनी सांगितले.

Cotton Rate News Updates
Soybean Market : ब्राझील विक्रमी सोयाबीन, मका निर्यात करणार

कापूस, सुत निर्यातही वाढेल

देशातून मागील काही महिन्यांमध्ये कापूस आणि सूत निर्यात घटली आहे. पण एप्रिल महिन्यापासून भारत कापूस आणि सूत निर्यात वाढवेल, अशी आशाही मंत्री गोयल यांनी व्यक्त केली. भारताने काही देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत.

त्यामुळं भारताला कमी विकसित देशांची सुविधा मिळत असलेल्या बांगलादेशसोबत स्पर्धा करता येईल. बांगलादेशची स्पर्धा पुढील दोन वर्षांमध्ये संपेल, असेही मंत्री गायल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com