उन्हाळ कांद्याची एकरी उत्पादकता घटणार?

यंदा क्षेत्र जास्त आहे ते रांगडा कायद्याचे. सरकारी आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळ कांद्याचे क्षेत्र केवळ दहा टक्क्यांनी वाढलेले दिसतेय. रांगड्याचे क्षेत्र अधिक असल्याने एप्रिलच्या मध्यापर्यंत पुरवठ्याचा दबाव आहे. एप्रिलच्या मध्यापासून पुढे उन्हाळ कांदा उत्पादन बाजाराची दिशा ठरवेल.
Summer onion productivity will decrease per acre
Summer onion productivity will decrease per acre
Published on
Updated on

यंदा क्षेत्र जास्त आहे ते रांगडा कायद्याचे. सरकारी आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळ कांद्याचे क्षेत्र केवळ दहा टक्क्यांनी वाढलेले दिसतेय. रांगड्याचे क्षेत्र अधिक असल्याने एप्रिलच्या (April) मध्यापर्यंत पुरवठ्याचा (Supply) दबाव आहे. एप्रिलच्या मध्यापासून पुढे उन्हाळ कांदा उत्पादन बाजाराची दिशा ठरवेल. सरकारी आकडेवारीनुसार उन्हाळ कांद्याचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० हजार हेक्टरने वाढलेले दिसतेय. एकूण क्षेत्र ४ लाख ५५ हजार हेक्टरपर्यंत विस्तारले आहे. परंतु क्षेत्र वाढले असले तरी हेक्टरी उत्पादकता मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहील, असे शेतकऱ्यांचा कानोस घेतला तर कळतेय. हेक्टरी उत्पादकता जर दहा टक्क्यांनी घटली तरी राज्यातील एकूण उन्हाळ कांद्याचे (Summer Onion) उत्पादन गेल्या वर्षीइतकेच राहणार आहे. हेही पाहा- Soybean, Maize Price: पोल्ट्री उद्योगाचा आधार

अशा परिस्थितीत जर आजपासून पुढे २०-२५ दिवस जर उन्हाळ माल हजार रुपयाच्या खाली गेला तर मात्र उन्हाळ मालाची विक्री थांबवावी आणि रांगडा माल विकू द्यावा. म्हणजे गेल्या वर्षी जशी शेतकऱ्यांनी ‘उन्हाळ थांबवा आणि रांगडा विका' अशी मोहिम सुरू केली होती, तशीच मोहिम जर एक नंबर क्वालिटीटा उन्हाळ कांदा हजार रुपयाच्या खाली जाऊ लागला तर आताही हाती घ्यावी लागेल असे दिसतेय. कारण रांगडा आणि उन्हाळ एकाच वेळी गर्दी करू लागले तर शेतकरी म्हणून आपल्याला फटका बसेल. हेही वाचा- Soyabean price: अमेरिकेचे सोयाबीन का खातेय भाव? सरकारी आकडेवारी, शेतकरी व व्यापाऱ्यांकडील माहिती, संभाव्य निर्यात मागणी, नैसर्गिक परिस्थिती याचा आढावा घेतल्यानंतर कांद्यासंदर्भात एक गोष्ट स्पष्ट आहे. ती म्हणजे १६ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीतील कांद्याच्या (Onion) सरासरी दरापेक्षा एप्रिलचा दुसरा पंधरवडा ते मे एंडचा सरासरी विक्री दर शंभर रुपयाने का होईना अधिक राहील. कारण या कालावधीत रांगड्याचा दबाव राहणार नाही, हे सोपे सूत्र आहे. हेही वाचा-Market Bulletin: शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच बातम्या रांगडा आवकेचे चित्र रांगडा कांद्याची टिकवण क्षमता कमी असते. सध्या कांद्याची जी आवक सुरू आहे, त्यात रांगड्याचा दबाव अधिक आहे. नाशिक जिल्ह्यातील आवकेत साधारण ८० टक्के रांगडा कांदा आहे. आता थोड्या प्रमाणात उन्हाळ मालही सुरू झालाय. नगर जिल्ह्यात तुलनेने आवक कमी प्रमाणात आहे; पण येथील बाजार समित्यांत ७० टक्क्यांवर उन्हाळ तर ३० टक्के रांगड्याची आवक आहे. पुणे, सोलापूरमध्येही टिकवण क्षमता कमी असणाऱ्या मालाची आवक सुरू आहे. गेली दोन वर्षे सप्टेंबर-ऑक्टोबरमधील लागवडीचा कांदा रोगराईन ग्रस्त होत होता, म्हणून या वर्षी संपूर्ण लेट खरीपाचा हंगामच दीड-दोन महिने पुढे सरकला. तोच माल आता बाजारात येतोय. सरकारी पीक पेऱ्यातही लेट खरीपाचे क्षेत्र वाढल्याचे दिसतेय. लेट खरीप जरा जास्तच लेट झाल्याने आणि त्याबरोबर आगाप उन्हाळ मालही आता गर्दी करू लागल्याने बाजार नरमाईत आहे. वणी दिंडोरी, उमराणे, सटाणा, घोडेगाव, पारनेर, लासलगाव येथील बाजार समित्यांच्या क्षेत्रातून फोनवरून समजलेल्या माहितीनुसार किमान दहा एप्रिलपर्यंत तरी रांगडा कांद्याची आवक सुरू राहील. तोपर्यंत बाजारात आवकेचा भर जास्त राहील. दुसरीकडे, देशभरात त्या त्या ठिकाणचा स्थानिक (लोकल) माल सुरू असल्याने महाराष्ट्रातील मालास स्पर्धा निर्माण झाली आहे. खरे तर होळीमुळे बाजारातील उठाव पाहता महाराष्ट्रातील मालासही जोरदार मागणी अपेक्षित होती; पण देशभरात लेट झालेल्या लोकल आवकांनी बाजार व्यापला आहे. उदा. सुखसागर जातीचा कांदा. उन्हाळ कांद्याची उत्पादकता किती? यंदा महाराष्ट्रात कांद्याची उत्पादकता किती राहणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या वर्षीइतकाच उतारा राहणार तर काहींचे म्हणणे आहे, १५ ते २० टक्के घटणार. सध्या काही जी उत्पादन वाढ दिसतेय, ती केवळ लेट खरीपातील रांगड्या कांद्याची आहे. सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडील माहिती मिळतीजुळती आहे. अशा परिस्थितीत यंदा मार्च-एप्रिलमध्ये जरूर बाजारात दबाव दिसेल पण मे पासून पुढे मात्र एकरी उत्पादकता नेमकी किती राहणार हा निकष फार महत्त्वाचा ठरेल. बहुतांश कांदा लागणी या १५ डिसेंबरनंतर झाल्या आहेत.  जानेवारी आणि फेब्रुवारातील लागणींची उत्पादकता तर तापमानवाढीमुळे हमखास कमी राहतेय. सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या धुळे जिल्ह्यात मधल्या काळात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपिट झाली. अवकाळी पावसानंतर करपा आणि बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते. त्यामुळे काही प्रमाणात उत्पादकता कमी होऊ शकते. एप्रिल-मे मध्ये  अवकाळी पाऊसमान कसे राहते यावरही बरेच काही अवलंबून आहे. म्हणून यंदा कांद्याबाबत आतापासून खूप उत्पादन आहे, असा अंदाज बांधणे घाईचे होईल. बाजाराच्या लढाईत उतरण्यापूर्वीच मनोबल खचलेले असू नये, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायला हवा. तापमानवाढीचा मुद्दा सुद्धा इथे दुर्लक्षित करून चालणार नाही. चालू आठवड्यांत अचानक तापमान वाढल्याचा परिणाम दिसू लागला आहे. जानेवारीतल्या कांदा लागणींना पुढचे तीस-चाळीस दिवस हे कडक उन्हाळ्यात काढायचे आहेत. अशा स्थिती एकरी उत्पादकता कमी राहणार असल्याची चिन्हे आहेत. निर्यातवाढीची अपेक्षा एप्रिल ते जून या तिमाहीत कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील कांदा पुरवठावाढीचा दबाव कमी होण्यासाठी त्याची मदत होईल. खास करून महाराष्ट्रातील पुरवठावाढ कमी होण्यासाठी अधिक उपयोग होईल. कारण निर्यातीत कांद्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. देशातील कांदा निर्यातीत निम्यापेक्षा अधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. यंदा जर २०१८-१९ प्रमाणे २० लाख टनाहून अधिक कांदा निर्यात झाला तर महाराष्ट्रातील पुरवठावाढ कमी होण्यास मदत होईल. १५ मार्चपासून निर्यात वाढण्याचे कारण असेल सध्याचे भारतातले बाजारभाव. जेव्हा जेव्हा भारतातील बाजार समित्यांत चांगल्या दर्जाच्या मालाचे भाव दीड हजाराच्या आसपास असतात, त्यावेळी निर्यातीची पडतळ चांगली मिळते. स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय मालास सर्वाधिक पसंती मिळते. रंग, चव, आकार अशा सर्व कसोट्यांवर आग्नेय आशिया आणि आखाती देशांत भारतीय कांद्याच्या स्पर्धेत अन्य देश टिकत नाहीत.

मार्च एन्डचे सोंग नको महाराष्ट्रात मार्च एन्डला आठ-आठ दिवस बाजार समित्या बंद ठेवण्याची कुप्रथा आहे.  सध्याची रांगडा कांद्याची आवक लक्षात घेता आणि पुढे एप्रिलमध्ये उन्हाळ कांद्याची संभाव्य आवक पाहता सरकारी नियमाप्रमाणे सलग तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बाजार समित्या बंद ठेऊ नयेत. शेतकरी संघटना आणि जागरूक शेतकऱ्यांनी बाजार सातत्याने सुरू राहतील यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे. अन्यथा एप्रिलमध्ये साचलेल्या मालाचा ताण टिकून राहील आणि उन्हाळ कांद्यालाही त्याचा फटका बसेल. त्यामुळे सर्व बाजार समित्या सुरळीत राहणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com