Sugar Production Decreased : देशातील साखर उत्पादन १८ लाख टनांनी घटलंः इस्मा

Sugar Market : देशातील साखर उत्पादनात यंदा घट झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन यंदा ५.४ टक्क्यांनी म्हणजेच उत्पादन १८ लाख टनांनी कमी राहील.
Sugar Market
Sugar MarketAgrowon

Sugar Production Update : देशातील साखर उत्पादनात यंदा घट झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन यंदा ५.४ टक्क्यांनी म्हणजेच उत्पादन १८ लाख टनांनी कमी राहील. साखर उत्पादन यंदा ३११ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदजा इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्माने व्यक्त केला.

इस्माने दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिलपर्यंत देशातील ४०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला. आता केवळ १३२ कारखाने सुरु आहेत. मागीलवर्षाचा विचार करता १५ एप्रिलनंतर देशातील ३०५ साखर कारखाने सुरु होते.

पुढील काही आठवड्यांमध्ये सध्या सुरु असलेल्या कारखान्यांचाही गाळपर हंगाम बंद होईल. पण उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

Sugar Market
Sugar Rate : साखरेच्या मागणी, दरातही विशेष वाढ नाही

पुढील आठवड्यात इस्माची बैठक होणार आहे. या बैठकीत देशातील उत्पादनाचा अचूक अंदाज काढता येईल. देशात गेल्या हंगामात साखर उत्पादनाचे उद्दीष्ट ३४० लाख टन होते. मात्र प्रत्यक्ष उत्पादन ३५७ लाख टनांवर पोचले होते. तर देशातील साखर वापर २७५ लाख टन झाला होता.

१५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्र, बिहार, ओडिशा आणि राजस्थानमधील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला. तर कर्नाटकातील केवळ २ आणि उत्तर प्रदेशातील ७७ साखर कारखान्यांचा पट्टा सुरु आहे. तमिळडूमधील एक आणि उत्तर प्रदेशातील काही कारखाने पुढील महिनाभर सुरु राहतील. तर एप्रिलच्या शेवटी इतर राज्यातील पूर्ण गाळप हंगाम संपला असेल.

महाराष्ट्रातील उत्पादन घटले

गेल्या हंगामात साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर होता. महाराष्ट्राने मागील हंगामात १२६ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदाचं उत्पादन मात्र १०५ लाख टनांवरच स्थिरावलं. तर उत्तर प्रदेशाती साखर उत्पादन ९४ लाख ४० हजार टनांवरून ९६ लाख ६० हजार टनांपर्यंत वाढणार आहे, असा अंदाजही इस्माने दिला.

Sugar Market
Sugar Production In Marathwada : मराठवाड्यात २ कोटी ३० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

साखरेचे दर तेजीत राहणार?

इथेनाॅल वापरासाठी साखर वापराचे प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत वाढले असून ३१ लाख टन साखरेचा वापर झाला आहे. तसेच साखरेच्या वाढत्या उन्हामुळे चांगली मागणी राहू शकते. परिणामी साखरेच्या दरात तेजी येईल. सध्या उत्तर प्रदेशात मिल्सचे भाव ३७ रुपेय प्रतिकिलोवर पोचले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com