
Egg Production : श्रीलंका अजूनही आर्थिक संकटातून जात आहे. पण श्रीलंकेत अंड्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे श्रीलंका भारतातून रोज दहा लाख अंडी आयात करणार आहे, असे श्रीलंकेतील आयातदार संस्थेने सांगितले.
श्रीलंका मागील दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई भासत असून अनेक देशांकडून मदत मागितली जात आहे. येथील पोल्ट्री व्यवसायावरही या सर्व घटनांचा मोठा परिणाम झाला.
परिणामी येथील अंडी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र दुसरीकडे श्रीलंकेतील अंडी मागणी वाढली. त्यामुळे श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात आयात करावी लागणार आहे.
श्रीलंका स्टेट ट्रेडिंग काॅर्पोरेशनचे अध्यक्ष असिरी वालीसुंदरा यांनी सांगितले की, भारतातून २ कोटी अंडी आयात केली जाणार आहे. त्यापैकी एक कोटी अंडी बाजारात आली आहेत. रोज १० लाख अंडी आयात केली जाणार आहे. ही खरेदी दोन पोल्ट्री फार्म्समधून होणार होती.
पण पशुधन उत्पादन विभागाने आणखी तीन फार्म्सचा समावेश केला. या पाच फार्म्समधून रोज १० लाख अंडी आयात होणार आहे.
श्रीलंकेत सध्या अंड्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दरातही वाढ झाली. याचा फटका सर्वसामान्य ग्राहक आणि उद्योगांना बसत आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आयातीतून पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे.
आयात अंडी बेकरी, बिस्कीट, मॅन्यूफॅक्चरींग, केटरींग सेवा आणि रेस्टाॅरंट्सना देण्यात येणार आहे. त्यासाठी ३५ श्रीलंकन रुपये प्रतिनग किंमत असेल, असेही वालीसुंदरा यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.