Soybean Global Market Rate : मागील दोन महिन्यांपासून दरवाढीची वाट पाहणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना आज काहीसा दिलासा मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean Rate) आणि सोयापेंडच्या दरात (Soymeal Rate) दोन दिवसांपासून दरात सुधारणा होत आहे.
तर देशातील बाजारातही दर वाढले. देशातील सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांवर आहे.
देशातील सोयाबीन दरात आज क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. सोयाबीन भावानं आज सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांचा टप्पा गाठला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते.
देशातील बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा जास्तच आहे. तरीही सोयाबीनला उठाव असल्यानं दरात वाढ झाल्याचं जाणकारांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४.७० डाॅलरवर होते. रुपयात हा भाव ४ हजार ५०० रुपये होते. तर सोयापेंडचे भाव ४६१ डाॅलर प्रतिटनांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर घटलेल्या भावपातळीवरून सुधारत आहेत.
पण दर अद्यापही आधीच्या भावपातळीवर पोचले नाहीत. सोयाबीनच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च महिन्याच्या सुरुवातीला मोठी घट झाली होती. पण ही स्थिती जास्त दिवस चालणार नाही, असा अंदाज ॲग्रोवनने त्यावेळीच दिला होता.
सोयाबीन आधार
देशातील सोयाबीन दराला आंतरराष्ट्रीय बाजाराचा आधार मिळतोच. शिवाय देशातून सोयापेंड निर्यात वाढली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट होतेय. सोयापेंडेसाठी सोयाबीनची खरेदी केली जाते. त्यामुळं दरात सुधारणा दिसतेय.
पण शेतकऱ्यांनी आवक मर्यादीत केल्यास दरातील सुधारणा आणखी वाढू शकते, तर आवक वाढल्यास दरावर दबाव येऊ शकतो, हेही लक्षात ठेवावं.
याकडेही लक्ष असू द्या
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर पूर्वपातळीवर येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास भारतीय सोयापेंडला मागणी राहील. यापूर्वी निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
पण आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढत असल्यानं देशातील दरही सुधारण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळं शेतकऱ्यांनी या सर्व फंडामेंटल्सकडे लक्ष ठेवावं, असं आवाहनही जाणकारांनी केलयं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.