Soybean Market: सोयाबीन बाजाराचे माॅन्सूनकडे लक्ष का?

Soybean Rate : देशात सध्या सोयाबीनचे भाव दबावात आहेत. देशात अजूनही ५९ लाख टन सोयाबीन गाळपाविना शिल्लक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरु आहेत. देशात यंदा पाऊसमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on: 
Updated on: 

Soybean Rate Update : देशात सध्या सोयाबीनचे भाव दबावात आहेत. देशात अजूनही ५९ लाख टन सोयाबीन गाळपाविना शिल्लक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरु आहेत. देशात यंदा पाऊसमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे यंदा देशात सोयाबीन पेरणी किती होते? सोयाबीन पिकाला पोषक हवामान राहील का? याकडे बाजाराचे लक्ष आहे. यावरून दरातील चढ उतार ठरू शकतात.

देशात खाद्यतेलाची आयात गेल्यावर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढली. खाद्यतेलाचे भावही कमी झाले. यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत.

खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या दरातही क्विंटलमागं ५०० रुपयांची नरमाई आली. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

आजही शेतकऱ्यांकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी भाववाढीची वाट पाहत आहेत. सोयापेंडचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामुळे दबावात आहे. तसेच देशातही यंदा सोयाबीन पुरवठा जास्त होता. त्यामुळे सोयापेंड उत्पादन जास्त राहणार आहे.

परिणामी सोयापेंडकडून सोयाबीन दराला यापुढे मिळणारा आधार कमीच राहीला. यामुळे सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. पण सरकारने उलटं आयातशुल्कात कपात केली.

Soybean Market
Soybean Market : खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीनचे भाव आणखी नरमतील का?

यंदा देशात एल निनोची स्थिती आहे. यामुळे यंदा देशात पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे. माॅन्सूनची वाटचालही अडखळतच सुरु आहे. आतापर्यंत देशात पेरणीयोग्य पाऊसच झाला नाही. त्यामुळे १६ जूनपर्यंत खरिपाच्या पेरण्या गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी पिछाडीवर आहेत. सोयाबीनची पेरणी ७० टक्क्यांनी कमी झाली.

पुढील काळात चांगला पाऊस झाल्यास पेरण्या वेग घेतील. पण यंदा महत्वाच्या सोयाबीन उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाऊसमान गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहणार आहे. या दोन्ही राज्यांतील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.

विदर्भ आणि मराठवड्यातील अनेक भागांमध्ये पाऊस यंदा दगा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादन किती राहील, याविषयीचा अंदाज वर्तविणे शक्य नाही. तसेच माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पाऊस कमी राहील, असा अंदाज आहे. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर होऊ शकतो.

त्यामुळे बाजाराचे लक्ष माॅन्सूनचा पाऊस, सोयाबीनच्या लागवडी आणि पिकाला पोषक वातावरण याकडे आहे. यापैकी एकही घटक अनुकूल नसला तरी सोयाबीन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. असे झाल्यास सोयाबीन बाजाराला आधार मिळेल.

देशात सध्या ५९ लाख टन सोयाबीन गाळपाविना आहे. यापैकी काही सोयाबीन लगेच बाजारात येईल. पावसाने जास्त ओढ दिली किंवा पेरण्या वेळेवर झाल्या नाहीतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.