आंध्र प्रदेशातील रयतु भरोसा केंद्राला (RBK) संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या (FAO) सेंटर फॉर चॅम्पियन्स ॲवॉर्डसाठी नामांकन जाहीर झाले आहे. आंध्र प्रदेशचे कृषी, सहकार आणि अन्न प्रक्रिया मंत्री के.जी.रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे.
सरकारी पातळीवरून खाद्य सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. बुधवारी (दिनांक ४ एप्रिल) आयोजित पत्रकारपरिषदेत के.जी.रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे. रयतु भरोसा केंद्राच्या (RBK) सहा पैलूंपैकी एका पैलूसाठी हे नामांकन मिळाले असल्याचे रेड्डी म्हणाले आहेत.
रयतु भरोसा केंद्र (RBK) या संकल्पनेने आंध्र प्रदेशातील शेतीचे चित्र पालटून टाकले आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरविण्यापासून ते त्यांच्या कृषिमालाची हमीभावाने (MSP) खरेदी करण्यापर्यंतची कामे रयतु भरोसा केंद्राच्या (RBK) माध्यमातून करण्यात येत असल्याचे रेड्डी म्हणाले.
शेती आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या गोष्टींची एकाच ठिकाणी पूर्तता करण्याच्या हेतूने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी राज्यात ही संकल्पना राबवली. आजमितीस आंध्र प्रदेशात १०,७७८ रयतु भरोसा केंद्रे (RBK) शेती आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या गरजांची पूर्तता करत आहेत. खते, रसायने, बी-बियाणे पुरवण्यापासून ते शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यापर्यंतच्या सेवा रयतु भरोसा केंद्रातर्फे (RBK) दिल्या जातात.
ही रयतु भरोसा केंद्रे (RBK) शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्राबद्दलही मार्गदर्शन करतात, असेही रेड्डी म्हणाले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आंध्र प्रदेश सरकारने २३.४० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. रब्बी हंगामासाठी ११९.४४ कोटी रुपये पिकविम्यापोटी शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ७८४ कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही जी. के. रेड्डी यांनी नमूद केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.